Close

चीज गार्लिक पराठा (Cheese Garlic Paratha)

चीज गार्लिक पराठा

साहित्य : 1 कप किसलेले चीज, 8-10 लसणाच्या पाकळ्या (बारीक चिरलेल्या), स्वादानुसार पराठा मसाला व मीठ.
कणकेसाठी : 3 गप गव्हाचे पीठ, स्वादानुसार मीठ.
इतर : तेल, तूप वा बटर.
कृती : नेहमीप्रमाणे कणीक मळून घ्या. सारणाचे सर्व साहित्य चांगले एकजीव करून घ्या. कणकेच्या लिंबाएवढ्या गोळ्या तयार करून त्यात चीजचे मिश्रण भरा आणि
पराठे लाटून घ्या. हे पराठे मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तेल, तूप वा बटर लावून खमंग भाजून घ्या.

Share this article