चणा पालक
साहित्य: 200 ग्रॅम उकडलेले लाल चणे, 3 जुड्या चिरून उकडलेला पालक, चिमूटभर राई, चिमूटभर जिरे, 1 टीस्पून ठेचलेली हिरवी मिरची, 10 ग्रॅम लसूण, 2 कांदे, चिमूटभर एव्हरेस्ट चणा मसाला, 100 ग्रॅम तेल, मीठ चवीनुसार.
कृती: कढईत तेल गरम करून लसूण टाका. कांदा टाकून परतनू घ्या. पालक, चणे टाकून मंद आचेवर 10-15 मिनिटे शिजवा. राई, जिरे, हिरवी मिरचीची फोडणी द्या. मीठ व एव्हरेस्ट छोले मसाला टाकून शिजवा. कोथिंबिरीने सजवून
सर्व्ह करा.
जयपुरी कुर्मा
साहित्य: 100 ग्रॅम फरसबी, 100 ग्रॅम चवळी, 100 ग्रॅम फ्लॉवर, 100 ग्रॅम टोमॅटो, 25 ग्रॅम गाजर, 25 ग्रॅम क्रीम, चिमूटभर जिरे, चिमूटभर राई, अर्धा टीस्पून वाटलेली हिरवी मिरची, चिमूटभर हळद, चिमूटभर एव्हरेस्ट गरम मसाला, चिमूटभर धणे पूड, चिमूटभर साखर, 200 ग्रॅम तेल, मीठ चवीनुसार.
कृती: फरसबी, टोमॅटो, चवळी, फ्लॉवर उकडून घ्या. कढईत तेल गरम करून राई व जिर्याची फोडणी द्या. यात गरम मसाला, धणेपूड व उकडलेल्या टोमॅटोची पेस्ट टाकून परतून घ्या. उकडलेल्या भाज्या टाका. मीठ घालून पाच मिनिटे शिजवा. क्रीमने सजवून सर्व्ह करा.