दृश्य स्वरूप, उच्चारांचा लहेजा आणि पेहरावाचा इंग्रजी भाषा चाचणीतील निकालावर अन्यायकारक परिणाम होत असल्याची परीक्षार्थींची धारणा सर्वेक्षणाद्वारे अधोरेखित
● उच्चारांच्या भारतीय लहेजामुळे इंग्रजी भाषा चाचणीतील गुणांवर अन्यायकारक रितीने परिणाम होत असल्याचे ६२ टक्के जणांना वाटते, तर ७४ टक्क्यांच्या मते त्यांच्या पेहरावाचा परिणाम निकालावर होतो
● भारतीय न भासणाऱ्या लहेजामध्ये उच्चार केल्यास चाचणीतील गुणांमध्ये सुधारणा होऊ शकत असल्याचे ६४ टक्के जणांना वाटते, तर वेगळा पेहराव करणे आवश्यक असल्याचे ७६ टक्क्यांना वाटते
मुंबई, 19 फेब्रुवारी २०२५: पीअरसन (एफटीएसई: PSON.L) या जगातील लाइफलाँग लर्निंग कंपनीतर्फे तसेच या कंपनीच्या इंग्लिश लँग्वेज लर्निंग व्यवसायातर्फे आज एका सामाजिक धारणा सर्वेक्षणातील माहिती प्रसिद्ध करण्यात आली. शिक्षण, कार्य व स्थलांतर व्हिजासाठी इंग्रजी भाषेची चाचणी घेणाऱ्या पीअरसन टेस्ट ऑफ इंग्लिशद्वारे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. आपल्या भारतीय लहेजातील उच्चारांमुळे संभाषण चाचणीच्या गुणांवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे इंग्रजी भाषेची चाचणी देणाऱ्या ५ पैकी ३ जणांना (६२ टक्के) वाटत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे आणि मानव परीक्षक असतो तेव्हा आपल्या पेहरावामुळे चाचणीतील गुणांवर परिणाम होत असल्याचे ४ पैकी जवळपास तीन जणांना (७४ टक्के) वाटत असल्याचेही समोर आले आहे. चाचणी देणाऱ्यांबद्दलच्या पूर्वग्रहदूषित धारणांबाबतची ठोस माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. हे पूर्वग्रह विशेषत: दिसणे, उच्चारांचा लहेजा आणि पोशाखाशी निगडित आहेत. केवळ परीक्षार्थींचे ज्ञान व क्षमता यांवरच लक्ष केंद्रित करणाऱ्या एका न्याय्य प्रणालीची आवश्यकता यामुळे अधोरेखित होते. लोकांचे भवितव्य इंग्रजी भाषेच्या चाचणीवर अवलंबून असते असे बरेच काही पणाला लागलेल्या परिस्थितींत तर हे अधिकच महत्त्वाचे आहे.
वेगवेगळे पूर्वग्रह, वेगवेगळी वर्तणूक
सर्वेक्षणानुसार, १० पैकी सुमारे ६ (५९ टक्के) प्रतिसाददात्यांना त्यांच्या वर्णामुळे वेगळी वर्तणूक मिळेल असे वाटते, गौरवर्णीयांना नकळत झुकते माप दिले जाण्याबद्दल त्यांना वाटणारी भीती यातून दिसून येते. ३ पैकी जवळपास २ जणांना (६४ टक्के) त्यांच्या पोशाखामुळे चुकीची छाप पडू शकेल असे वाटते. या धारणा महाराष्ट्रातील परीक्षार्थींमध्ये विशेषत्वाने ठाम आहेत. महाराष्ट्रातील ६७ टक्के परीक्षार्थींमध्ये ही ठाम धारणा दिसून आली. नोकरीचे स्वरूप आणि शैक्षणिक पार्श्वभूमी यांचाही मिळणाऱ्या वर्तणुकीवर परिणाम होण्याची चिंता १० पैकी ७ प्रतिसाददात्यांनी व्यक्त केली. ही चिंता महाराष्ट्र, तमिळनाडू आणि उत्तरप्रदेशातील परीक्षार्थींमध्ये विशेषत्वाने आढळते. प्रतिष्ठेची नोकरी किंवा उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी असेल तर आपल्याला आदराने वागवले जाईल, असे या राज्यांतील परीक्षार्थींना वाटते.
समाजातील धारणांचा चाचणीतील गुणांवर परिणाम होण्याची शक्यता
नकळत बाळगल्या जाणाऱ्या पूर्वग्रहांचा परिणाम खोलवर जातो. एखादी व्यक्ती जे बोलते त्यातून ती किती चतुर व ज्ञानी आहे याचे प्रतिबिंब दिसते असे जिथे मानले जाते, त्या भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात याचा प्रत्यय विशेषत्वाने येतो. सर्वेक्षणानुसार, उच्चारांतून भारतीय लहेजा काढून टाकल्यास चाचणीतील गुणांवर सकारात्मक परिणाम होईल असे ५ पैकी ३ हून अधिक (६३ टक्के) परीक्षार्थींना वाटते. असे वाटणाऱ्यांचे प्रमाण आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये अधिक आहे. एखाद्या व्यक्तीच्या दर्शनी रूपाचाही परीक्षेच्या निकालावर परिणाम होत असल्याचे समजले जाते. पंजाबमध्ये ही भावना सर्वांत तीव्रपणे जाणवते, दर्शनी रूपाचा परिणाम संभाषण चाचणीतील गुणांवर होऊ शकतो असे पंजाबमधील ७७ टक्के प्रतिसाददात्यांनी नमूद केले आहे.
योग्य छाप पाडण्यासाठी स्वत:च्या वास्तव रूपात बदल करणे
विशिष्ट पद्धतीने उच्चार केल्यास संभाषण चाचणीत अधिक गुण मिळवण्यात मदत होऊ शकते असा विचार ३ पैकी सुमारे २ जण (६४ टक्के) करतात. अमेरिकी शब्दोच्चार केल्यास चाचणीत अधिक गुण मिळतात असे तमिळनाडूतील प्रतिसाददात्यांसह एकूण ३५ टक्के प्रतिसाददात्यांना वाटते. तर २१ टक्के जणांना ब्रिटिश शब्दोच्चार अधिक फायद्याचे ठरतात असे वाटते, यात उत्तरप्रदेशातील परीक्षार्थींचे प्रमाण अधिक आहे. औपचारिक पोशाख केल्यास आपण ‘प्रोफेशनल’ अनुभव निर्माण करू शकतो आणि त्यामुळे परीक्षेतील गुण वाढतात, असे ४ पैकी ३ हून अधिक (७६ टक्के) परीक्षार्थींना वाटते.
पीअरसन इंडियाचे इंग्रजी भाषा विभाग संचालक प्रभुल रवींद्रन सांगतात, "भारतात अनेक वर्षांपासून लोकांना त्यांचे उच्चार आणि दिसणे याबद्दल वाटणाऱ्या असुरक्षितता त्यांना उपलब्ध असलेल्या संधी निर्धारित करत आहेत, आणि अखेरीस त्यांच्या उत्पन्नाच्या संभाव्यतांवर याचा परिणाम होत आहे. लोकांचे भवितव्य पणाला लागलेले असण्याच्या महत्त्वपूर्ण परिस्थितींमध्येही याचा परिणाम होताना आम्ही बघितले आहे. इंग्रजी भाषेची परीक्षा आणि व्यापक जागतिक गमनशीलतेच्या क्षेत्रातही ही आव्हाने आहेतच. मात्र, पीअरसनमध्ये आम्ही हे चित्र पालटून टाकण्यासाठी काम करत आहोत. आमची मूल्यमापन प्रणाली जबाबदार एआय व भाषा तज्ज्ञांचा उपयोग करून घेते आणि केवळ भाषेतील प्रावीण्यावर लक्ष केंद्रित करते. शब्दोच्चारांच्या १२५ हून अधिक पद्धती ओळखणाऱ्या तंत्रज्ञानाद्वारे समोरासमोर मुलाखतींपासून ही प्रणाली मुक्त आहे. पूर्वग्रह नाहीसे करणारी आणि इंग्रजी भाषेच्या कौशल्यांवर भर देणारी चाचणी तयार करून एक सकारात्मक व समावेशक वातावरण निर्माण करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवतो. या वातावरणात प्रत्येकाला आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची योग्य संधी मिळते.”
इंग्रजी भाषेच्या अधिक नाय्य चाचण्यांची आवश्यकता अधोरेखित करण्याच्या उद्देशाने पीअरसन टेस्ट ऑफ इंग्लिशच्या नवीन अभियानाद्वारे ही माहिती प्रसृत केली जात आहे. सामाजिक साच्यांमध्ये बसण्यासाठी लोक त्यांचे दिसणे व बोलणे यात बदल करण्याचा प्रयत्न करतात याकडे लक्ष वेधून, क्षमता व संभाव्यता केंद्रस्थानी आणणारे न्याय्य, पूर्वग्रहमुक्त वातावरण तयार करणाऱ्या चर्चेला प्रेरणा देण्याचा अभियानाचा प्रयत्न आहे.