कॅबेज चीझ ब्रेड स्टिक्स
साहित्य : स्टिक्ससाठी : 2 कप ब्रेडचा चुरा, पाव कप बारीक चिरलेला कोबी, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप किसलेला चीझ, 1 टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार साखर, तळण्यासाठी तेल.
इतर : 2 टेबलस्पून मैदा, चिमूटभर मीठ, अर्धा कप ब्रेडचा चुरा.
कृती : तेलाव्यतिरिक्त स्टिक्ससाठीचं सर्व साहित्य चांगलं एकजीव करा. या मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे घेऊन, त्यांना लांबट काठीप्रमाणे आकार द्या. मैद्यामध्ये मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी मिसळून दाट घोळ तयार करा. आता प्रत्येक स्टिक मैद्याच्या मिश्रणात घोळून ब्रेडच्या चुर्यात घोळवा आणि गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळा. गरमागरम कॅबेज चीझ ब्रेड स्टिक्स हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.