Close

कॅबेज कूट व व्हेज स्टर फ्राई (Cabbage Coot And Veg Star Fry)

कॅबेज कूट
साहित्य: 1 बारीक चिरलेला कोबी, 3 टोमॅटो, 50 ग्रॅम मूग डाळ, 10 ग्रॅम हिरवी मिरची, अर्धा टीस्पून जिरे, किसलेला ओला नारळ, चिंच, गुळ, चिमूटभर हिंग व मीठ चवीनुसार.
कृती: खोबरं, जिरे, हिरवी मिरची एकत्र करून वाटून घ्या. मूग डाळ धुवून थोडा वेळ पाण्यात भिजवा. मीठ व हळद टाकून उकडून घ्या. डाळ शिजल्यावर त्यात टोमॅटो व कोबी टाका. 10-15 मिनिटे शिजवा. यात मीठ, गुळ व हिंग टाका. खोबर्‍याचे वाटण टाका. थोडा वेळ शिजू द्यावे. कॅबेज कूट तयार आहे.

व्हेज स्टर फ्राई
साहित्य: 1 वाटी मोड आलेले मूग, 1 गाजर, 5 फरसबी, अर्धा कप कोबी, 1 पॅकेट उकडलेले नूडल्स, अर्धा टीस्पून साखर, 1 टीस्पून व्हिनेगर, 1 टीस्पून बारीक चिरलेला लसूण, अर्धा टीस्पून मीठ.
कृती: गाजर, फरसबी व कोबी उभे व पातळ चिरून घ्या. एका पॅनमध्ये लसूण टाकून परतून घ्या. सगळ्या भाज्या व मूग घालून भाज्या नरम होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. नूडल्स टाका. मीठ, साखर व व्हिनेगर टाकून व्यवस्थित मिक्स करून सर्व्ह करा.

Share this article