Close

बिग बॉस’च्या ग्रँड फिनालेला जाणाऱ्या ‘टॉप ५’ स्पर्धकांची नावे जाहीर; विकी जैनचा बिग बॉसमधील प्रवास थांबला (Bigg Boss-17 Latest Update, Vicky Jain Eliminated)

आता ‘बिग बॉस १७’चा प्रवास संपत आला आहे. नुकतंच या घरात एलिमिनेशन पार पडलं. अंकिता लोखंडेचा पती विकी जैन याला ‘बिग बॉस १७’च्या घरातून बाहेर काढण्यात आलं आहे. ‘बिग बॉस’च्या नुकत्याच पार पडलेल्या भागामध्ये ग्रँड फिनालेला जाणाऱ्या ‘टॉप ५’ स्पर्धकांची निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी अभिषेक कुमार हा पहिला फायनलिस्ट बनला. तर, त्याच्यानंतर मन्नारा चोप्रा आणि मुनव्वर फारुकी यांना अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. नंतर, ‘बिग बॉस’ने विकी जैन, अरुण महाशेट्टी, अंकिता लोखंडे या तीन स्पर्धकांमधून विकी जैन याला बाहेर पडण्याचा आदेश देत, अरुण आणि अंकिता यांना अंतिम फेरीतील स्पर्धक म्हणून घोषित केले. पती घराबाहेर जाणार असल्याचे कळताच अंकिता लोखंडे रडू लागली.

‘बिग बॉस’ने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर अंकिता आणि विकीने त्यांच्या बिग बॉसच्या प्रवासाविषयीच्या आठवणी शेअर केल्या. अंकिताने म्हटले की, तिच्यासाठी हा खूप कठीण प्रवास होता. कारण या प्रवासात तिने इतरांसोबत खूप संघर्ष केला. पण, जेव्हा ही गोष्ट विकी जैनची आली, तेव्हा तिने माघार घेतली. विकीने यावेळी म्हटले की, त्याला आता त्यांचे नाते अधिक चांगल्या प्रकारे समजू लागले आहे आणि बिग बॉसमुळे त्याला त्याच्या चुका कळल्या, याचा आनंद आहे.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी विकीने सर्वांना मिठी मारली. अंकितानेही रडत आपल्या पतीला मिठी मारली आणि म्हटले की, तिला विकीचा खूप अभिमान आहे. अंकिता म्हणाली, ‘तू खूप चांगला खेळ खेळला आहेस. तू कोणाच्याही आधाराशिवाय इथे आलास आणि शोमध्ये तुझी जागा निर्माण केलीस. मला तुझी पत्नी असल्याचा अभिमान आहे. मी अभिमानाने सांगू शकते की, मी अंकिता लोखंडे आहे, विकी जैनची पत्नी आहे.’

अंकिताला ढसाढसा रडताना पाहून विकीने पुन्हा एकदा अंकिताची थट्टा केली आणि म्हणाला की, ‘आता बाहेर जातोय ते, मी जोरदार पार्टी करणार आहे.’ यावेळी बिग बॉस देखील विकीच्या या थट्टा मस्करीत सामील झाले आणि म्हणाले की, ते देखील विकीची बाहेर पार्टी करण्यासाठी वाट पाहत आहेत.

बिग बॉस १७ चा ग्रँड फिनाले २८ जानेवारी २०२४ रोजी पार पडणार आहे. सध्या निवड करण्यात आलेल्या स्पर्धकांपैकी मुनव्वर फारुकी हा विजेता होऊ शकतो अन्‌ अंकिता लोखंडे ही दुसऱ्या क्रमाकांची दावेदार मानली जात आहे. विजेत्यास ३० ते ४० लाख रुपयांचं बक्षीस मिळू शकतं. ट्रॉफी आपल्या नावे करण्यासाठी घरातील सर्व स्पर्धकांमध्ये चढाओढ होत असलेली पाहायला मिळत आहे.

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/