Close

भेंडी अनारदाना व कढई पनीर (Bhendi Anardana And Kadhai Paneer)

भेंडी अनारदाना
साहित्यः 400 ग्रॅम भेंडी, 2 मध्यम आकाराचे कांदे, दीड कप तेल, 2 टेबलस्पून अनारदाना पावडर, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 1 टेबलस्पून कोथिंबीर, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, अर्धा टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून तिखालाल मिरची पूड.
कृतीः कांदा चिरून घ्या. भेंडी धुवून मधे कापून घ्या. एका भांड्यात मिरची पूड, धणे पूड, हळद, अनारदाना पावडर, गरम मसाला व मीठ टाका. यात 4 टेबलस्पून तेल टाकून व्यवस्थित मिक्स करा. हा मसाला भेंड्यात भरून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून चिरलेला कांदा टाका. कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. भेंडी टाकून परतून घ्या. लिंबाचा रस टाकून गरम-गरम सर्व्ह करा.

कढई पनीर
साहित्य: 250 ग्रॅम तुकडे केलेले मलाई पनीर, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, प्रत्येकी 1 लांब कापलेली पिवळी, लाल व हिरवी भोपळी मिरची, 1 टीस्पून धणे, 1 टीस्पून जिरे, 2 दालचिनीचे तुकडेे, 2 वेलची, 2 लवंग, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून काजूची पेस्ट, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा कप क्रीम, 4 टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार.
कृती: कढईत तेल गरम करून पनीर तळून घ्या. उरलेल्या तेलात जिरे, धणे, दालचिनी, वेलची व लवंग टाकून परतून घ्या. आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल मिरची व गरम मसाला टाकून 2-3 मिनिटे परता. तळलेले पनीर टाका. लाल, पिवळी व हिरवी भोपळी मिरची टाका. 1-2 मिनिटे शिजवा. काजुची पेस्ट व क्रीम टाकून व्यवस्थित मिक्स करा. 1-2 मिनिटे शिजवा. गरम-गरम सर्व्ह करा.

Share this article