Close

भरली वांगी आणि बटाट्याची गोड कचोरी (Bharli Vangi And Batatyachi God Kachori)

भरली वांगी
साहित्य: 250 ग्रॅम लहान वांगी, 4 बटाटे (मोठे तुकडे).
सारणासाठी: 1/4 कप नारळ (किसलेले), 1 टीस्पून लसूण - हिरवी मिरची पेस्ट, 1 चिमूट हिंग, 1 कप कांदा (चिरलेला), 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून शाही गरम मसाला, 1 कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून तेल, चवीनुसार मीठ.
कृती : वांग्याचे मधोमध काप करून बाजूला ठेवा. बटाटे हलके शिजवून घ्या. कोथिंबीर आणि हिंग वगळता सारणाचे उर्वरित साहित्य एकत्र करा आणि हे मिश्रण दोन भागांमध्ये विभागून घ्या. चिरलेल्या वांग्यांमध्ये एक भाग भरा आणि 10 मिनिटे वाफेवर शिजवा. कढईत तेल गरम करून त्यात हिंग परतून घ्या. नंतर उरलेले मिश्रण घालून थोडावेळ परतून घ्या. त्यात 1 कप पाणी घालून 5 मिनिटे मंद आचेवर शिजवा. आता त्यात वांगी आणि बटाटे घालून 3 मिनिटे शिजवा. कोथिंबिरीने सजवा आणि पोळीबरोबर सर्व्ह करा.

बटाट्याची गोड कचोरी
साहित्य: 2 वाट्या उकडलेले बटाटे, 1 वाटी किसलेले खोबरे, अर्धी वाटी साखर, 1/4 टीस्पून वेलची पूड, 1/4 वाटी मावा, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर किंवा वाटलेला साबुदाणा, तळण्यासाठी तूप किंवा तेल.
कृती : बटाटे उकडून किसून घ्या, त्यात एक चमचा कॉर्नफ्लोअर घाला, उपवासाची कचोरी करायची असेल तर त्यात साबुदाणा घाला. पीठ चांगले मळून घ्या. कढईत किसलेले खोबरे, साखर आणि मावा एकत्र करून शिजवून घ्या. मिश्रण कोरडे झाल्यावर त्यात वेलची पूड घाला. बटाट्याच्या पिठाचे छोटे गोळे करून घ्या. त्यात नारळाचे मिश्रण भरून कचोर्‍या बनवा. आता कढईत तेल किंवा तूप गरम करून कचोर्‍या तळून घ्या आणि गोड चटणीबरोबर सर्व्ह करा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/