बीट सूप
साहित्य : 1 कप बारीक किसलेला बीट, अर्धा कप भिजवलेली तूर डाळ, अर्धा लीटर पाणी, अर्धा टीस्पून लिंबाचा रस, थोडा किसलेला गूळ, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार काळी मिरी पूड.
कृती : कुकरमध्ये बीट, तूर डाळ आणि पाणी घालून 2 शिट्या काढा. कुकर थंड झाल्यावर मिश्रण बाहेर काढून गाळून घ्या. गाळणीमध्ये उरलेला चोथा मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. वाटणात गाळलेलं पाणी पुन्हा एकत्र करून आचेवर पाच मिनिटं उकळत ठेवा. नंतर त्यात मीठ, काळी मिरी पूड, गूळ आणि लिंबाचा रस एकत्र करून एक उकळी काढा आणि गरमागरम बीट सूप सर्व्ह करा.
Link Copied