Close

बेक करताय ? (Baking Tips for Cakes)

नवीन वर्षासाठी केक करताय्? बेक करताना तुम्हालाही टेन्शन येतं? आता मुळीच टेन्शन घेऊ नका. कारण या टिप्स तुमच्यासाठी बेकिंग सोपं करतील.

बेक करणं केक खाण्याएवढं सोपं नक्कीच नसतं! साहित्य, प्रमाण, कृती, तापमान, बेक करण्याचा कालावधी... काहीही थोडं इथे-तिथे झालं की, तो पदार्थ बिघडलाच समजा. मग तो केक असो, कुकीज असो, मफिन्स असो किंवा अजून काही. म्हणूनच बर्‍याच सुगरणीही बेक करताना थोड्या तणावात असतात. मात्र आता घाबरण्याची गरज नाही. कारण या टिप्स तुमच्यासाठी बेकिंग सोपं करतील.

  • बेक करण्यापूर्वी ओव्हन प्रीहिट करा. त्यानंतरच बेकिंग ट्रे ओव्हनमध्ये ठेवा.
  • ज्या तापमानावर बेक करायचं आहे, त्याच तापमानावर 10 मिनिटांसाठी ओव्हन प्रीहिट करा.
  • केक तयार करताना मिश्रण जास्त दाट झालं असेल तर, त्यात आवश्यकतेनुसार दूध मिसळा.
  • बिस्किटं, कुकीज आणि केक तयार करताना साहित्याच्या प्रमाणावर विशेष लक्ष ठेवा. प्रमाण थोडं कमी-जास्त झालं तर तो पदार्थ परफेक्ट बनणार नाही.
  • केक तयार करताना मिश्रण हाताने फेटण्याऐवजी, इलेक्ट्रिक बीटरचा वापर करून एकाच दिशेने बीट करा.
  • केकमध्ये अंडं घालायचं असेल आणि अंडी फ्रीजमध्ये असतील तर, केक तयार करण्याच्या किमान दोन-तीन तासांपूर्वी ती फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा. अर्थात, अंडी सामान्य तापमानावरच फेटून केकच्या मिश्रणात मिसळा.
  • केकमध्ये बेकिंग पावडर मिसळण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट अवश्य तपासून घ्या.
  • मिश्रणात सुकामेवा मिसळायचा असेल, तर या मेव्यावर आधी मैदा भुरभुरा. कोरड्या मैद्यात घोळवलेला सुकामेवा मिश्रणात मिसळा.
  • एकदा का बेकिंग ट्रे ओव्हनच्या आत ठेवला की, वारंवार ओव्हनचा दरवाजा उघडू नका. यामुळे ओव्हनचं तापमान कमी-जास्त होऊ शकतं.
  • केक बेक करून ओव्हनमधून बाहेर काढल्यानंतर पूर्णतः थंड होऊ न देता, कोमट असतानाच ट्रेमधून डिमोल्ड करा.
  • केक सामान्य तापमानावरच थंड होऊ द्या. थंड होण्यासाठी तो पंख्याखाली ठेवू नका, यामुळे केकचा वरील थर कडक होण्याची शक्यता असते.
  • ओव्हनमध्ये बेकिंग करताना सिल्वर फॉईलचा वापर मुळीच करू नका.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/