बेक्ड पोटॅटो सूप साहित्य: 4 मोठे बटाटे, 1 /4 कप फ्रेश क्रीम, 1 चमचे बटर, 1 /4 कप दूध, चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर. कृती: 180 डिग्री सेल्शिअसवर बटाटे मऊ होईपर्यंत ओव्हनमध्ये भाजा. नंतर साल काढून त्यात बटर घाला आणि मॅश करा. फ्रेश क्रीम, दूध आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवा. मीठ आणि काळीमिरी पावडर घाला आणि गरमागरम सर्व्ह करा. बटाट्याची फ्रँकी साहित्य: 5-6 उकडून कुस्करलेले बटाटे, 2 वाट्या मैदा, 1 टेबलस्पून व्हिनेगर, 1 टेबलस्पून फ्रँकी मसाला (बाजारात उपलब्ध असतो किंवा त्याऐवजी चाट मसाला वापरू शकता), 2 कांदे, चवीनुसार मीठ. कृती : मैद्याच्या पिठात पाणी आणि मीठ घालून बॅटर बनवा. पॅन गरम करून डोस्याप्रमाणे बॅटर टाकून त्याच्या पोळ्या बनवा. मॅश केलेल्या बटाट्यामध्ये व्हिनेगर, मीठ, फ्रँकी मसाला आणि कांदे घालून कटलेट बनवा. नंतर पोळ्यांमध्ये तयार बटाट्याचे कटलेट आणि कांदे घाला आणि रोल तयार करा.
Link Copied