साहित्यः 50 ग्रॅम बदाम ( भिजवून, उकळून साल काढून घ्या), 200 मि.ली. दूध, पाव टीस्पून केशर, 4-5 टेबलस्पून कंडेंस्ड मिल्क, सजावटीसाठी थोडेसे काजू व बदामाचे काप. कृतीः थोडेसे दूध घालून बदाम मिक्सरमध्ये वाटून घ्या. हे पेस्ट दुधात घालून त्यात कंडेंस्ड मिल्क व केशर घाला. थंड होण्यासाठी 2-3 तास फ्रिजमध्ये ठेवा. बदाम व काजूच्या काप घालून सजवा.
Link Copied