'वा खूप छान', 'खूप सुंदर', 'उत्तम नृत्य' अशा अनेक कमेंटद्वारे मिळणारी कौतुकाची थाप कोणाला नको असेल. अशाच कौतुकाचा वर्षाव सध्या सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटीलवर होताना दिसत आहे. हो कारण हाच लावणी किंग त्याच्या टीमसह 'सुंदरी - The history of Lavani (अदा ताल शृंगार)' या नव्या शोमधून रसिकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाला आहे. ६ फेब्रुवारीला NMACC मुंबई येथे या शोचा श्रीगणेशा झाला. आणि या शोला प्रेक्षकांनी हाऊसफुल्लचा बोर्ड लागायला मदत केली. हाऊसफुल्ल अशा या शोमधून आशिष पाटील आणि त्याच्या टीमचं तोंडभरून कौतुक करण्यात आलं.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA0066-800x600.jpg)
इतकंच नव्हे तर या शोच्या सादरीकरणाला उपस्थितांचे डोळे पाणावले आणि आपसूक सगळ्यांनी स्टँडिंग ओव्हेशन देत या कार्यक्रमाला दाद दिली. हाउसफुल्ल झालेल्या मुंबईच्या या शोला आशिष पाटीलच्या मोहक अदांनी भुरळ घालत चारचाँद लावले. तर गणपत पाटीलचा परफॉर्मन्सही थक्क करणारा होता. अर्थात त्याच्या 'सुंदरी - The history of Lavani (अदा ताल शृंगार)' या शोचे हे खूप मोठे यश आहे. याची सुरुवातच अभूतपूर्व यशाने झाली असून यशाच्या असंख्य पायऱ्या अजून हा शो नक्की चढेल यांत शंका नाही. स्वप्ननगरी मुंबई येथून या शोला सुरुवात झाली असून आता जगभरात या शोची वाटचाल सुरु झाली आहे.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA0008-1-450x800.jpg)
नुकत्याच झालेल्या कार्यक्रमादरम्यान आशिष पाटीलच्या 'सुंदरी - The history of Lavani (अदा ताल शृंगार)' या शोनंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. इतकंच नव्हेतर, आशिषचा गणपत पाटीलचा परफॉर्मन्स साऱ्यांना मंत्रमुग्ध करून सोडणारा ठरला. प्रेक्षकांकडून कामाची पोचपावती मिळाल्यानंतर आशिष पाटीलसह त्याच्या टीमच्या डोळ्यातही अश्रू आले. या संपूर्ण अनुभवाबाबत बोलताना आशिष पाटील म्हणाला की, "हा अनुभव अविस्मरणीय होता. आमच्यासाठी देवता असणाऱ्या या साधनेला प्रेक्षकांनी जी दाद दिली त्यासाठी मी कायम त्यांचा ऋणी राहीन. नृत्याविष्कारानंतर प्रत्येकाच्या डोळ्यातील ती चमक, ते अश्रू आणि मिळालेलं स्टँडिंग ओव्हेशन अर्थात आमच्या मेहनतीची पोचपावती आहे. हा अनुभव खरंतर शब्दात मांडणं कठीण जातोय कारण त्यावेळी तो डोळ्यातून मांडला गेला. आशा करतो की यापुढील प्रत्येक शोला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देतील".