सुप्रसिद्ध दिग्ग्ज गायिका आशा भोसले यांनी नुकत्याच दुबईतील कॉन्सर्टमध्ये अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी वर चित्रित 'तौबा तौबा' हे नवीन ट्रेंडिंग गाणं गायलं. आशा भोसले यांच्या आवाजात ते गाणं ऐकून सगळ्यांना खूप आनंद आणि आश्चर्य वाटलं. व्हायरल झालेल्या या गाण्याला जेव्हा आशा भोसले यांच्या आवाजाची साथ मिळाली तेव्हा सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु झाली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर त्यावर प्रेक्षकांकडून देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशात या गाण्याचा गायक करण औजलानं देखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत त्याला बेस्ट मोमेंट म्हटलं आहे.
आशा भोसले यांच्या कामगिरीचा व्हिडिओ कडक एफएमच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर आशा भोसले यांच्या या परफॉर्मन्सची इंटरनेटवरही भरभरून स्तुती करण्यात आली. एका इन्स्टाग्राम युजरने लिहिले, “आशा भोसले यांनी दुबई शोमध्ये केवळ ‘तौबा तौबा’ गायलेच नाही, तर त्यावर डान्सही केला! ! लिजेंडरी! ” दुसऱ्याने लिहिले, “त्यांचा गोडसा डान्स. वाह”. एका चाहत्याने हा डान्स “आयकॉनिक आहे” असे म्हटले.
हे गाणे तयार करणाऱ्या करण औजलाने इन्स्टाग्राम स्टोरीत आशा भोसले यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहिली. त्याने म्हटले, “आशा भोसलेजी, संगीताच्या जिवंत देवीने ‘तौबा तौबा’ गाणं, गायलं… एका अशा मुलाने लिहिलेलं गाणं, जो एका छोट्या गावात वाढला, ज्याला संगीताचा कुठलाही वारसा नव्हता, संगीत साधनांविषयी काहीही ज्ञान नव्हतं. ही धून अशा व्यक्तीकडून तयार झाली, जो कोणतंही वाद्य वाजवत नाही. या गाण्याला फक्त चाहत्यांकडूनच नाही, तर संगीत क्षेत्रातील कलाकारांकडूनही खूप प्रेम आणि ओळख मिळाली. मात्र, हा क्षण खरोखरच आयकॉनिक आहे आणि मला आयुष्यभर लक्षात राहील. मी खूप धन्य झालो आहे. हा क्षण मला तुमच्यासाठी आणखी चांगल्या धुन तयार करण्यासाठी प्रेरणा देतो.”
हे गाणे तयार करणाऱ्या करण औजलाने इन्स्टाग्राम स्टोरीत आशा भोसले यांच्याबद्दल भावनिक पोस्ट लिहिली. करणने आशा भोसले यांच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ शेअर करत लिहिले, “मी हे २७ व्या वर्षी हे गाणं लिहिलं होतं, पण त्यांनी ते ९१ व्या वर्षी माझ्यापेक्षा चांगलं गायलं.” आशा भोसले यांनी दुबईतील सोनू निगमबरोबरच्या कॉन्सर्टमध्ये ‘तौबा तौबा’वर परफॉर्मन्स दिला.
(Photo Credit – Karan Aujla)