Close

राजकुमार राव आणि पत्रलेखा लवकरच आपल्या चाहत्यांना देणार आनंदाची बातमी, दोघांचे एकत्र प्रोजेक्ट तर नसेल? (Are Rajkummar Rao And Patralekhaa Teaming Again New Project?)

स्त्री या चित्रपटामुळे घरोघरी लोकप्रिय झालेला बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि त्याची अर्धांगिनी पत्रलेखा यांची जोडी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी कपल पैकी एक आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या लव्हस्टोरीची कायम चर्चा होताना दिसते. राजकुमार आणि पत्रलेखा यांनी ११ वर्षांच्या मैत्रीनंतर नोव्हेंबर २०२१ ला लग्न केलं होतं. आता दोघांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. चाहत्यांना लवकरच एक आनंदाची बातमी सांगणार असल्याचं या जोडप्यानं म्हटलं आहे.

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या अलीकडील या इंस्टाग्राम पोस्टने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. अभिनेत्यानं पोस्ट शेअर करत लिहिलं, ‘काहीतरी खूप खास घडणार आहे. हे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी उत्सुक आहे. आमच्याशी जोडलेले राहा.’ तर यासोबतच खाली टीप देत त्यानं आम्ही आईबाबा होणार नाही आहोत, असंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नेमकी कोणती आनंदाची बातमी हे जोडपं शेअर करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता अलिकडेच तृप्ती डिमरीसोबत विकी विद्या का वो वाला व्हिडिओ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तर त्याआधी तो श्रद्धा कपूरसोबत स्त्री २ मध्येही झळकला होता. तर पत्रलेखा ही प्रतीक गांधी याच्यासोबत फुले या हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे. यात ती सावित्रीबाईंची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/