साहित्यः 250 ग्रॅम अरवी (अळूचे कंद), 2 उकडलेले बटाटे, 1 टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 टीस्पून जिरे,
2 टीस्पून गरम मसाला, 1 कप कॉर्नफ्लोर, तेल गरजेनुसार.
ग्रेव्हीसाठीः 1 जुडी पालक, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, 1 टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, अर्धा कप क्रीम, 2 टीस्पून तेल, मीठ चवीनुसार.
कृतीः कोफ्ते बनवण्यासाठीः अरवी उकडून कुस्करून घ्या. यात सगळे साहित्य टाकून छोटे वडे बनवून तळून घ्या.
ग्रेव्हीसाठीः पालक मिक्सरमधून वाटून घ्या. तेल गरम करून आलं-लसूण पेस्ट हिरवी मिरची टाकून परतून घ्या. आता यात पालकाची पेस्ट, क्रीम व मीठ टाका. एक उकळी येऊ द्या. मिश्रण कोफ्त्यावर टाकून काही मिनिटे मंद आचेवर शिजवा. गरम-गरम सर्व्ह करा.
अरवीचे कोफ्ते (Araviche Kofta)
Link Copied