अरवीचे कोफ्ते साहित्यः 250 ग्रॅम अरवी (अळूचे कंद), 2 उकडलेले बटाटे, 1 टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 टीस्पून जिरे, 2 टीस्पून गरम मसाला, 1 कप कॉर्नफ्लोर, तेल गरजेनुसार. ग्रेव्हीसाठीः 1 जुडी पालक, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, 1 टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, अर्धा कप क्रीम, 2 टीस्पून तेल, मीठ चवीनुसार. कृतीः कोफ्ते बनवण्यासाठीः अरवी उकडून कुस्करून घ्या. यात सगळे साहित्य टाकून छोटे वडे बनवून तळून घ्या. ग्रेव्हीसाठीः पालक मिक्सरमधून वाटून घ्या. तेल गरम करून आलं-लसूण पेस्ट हिरवी मिरची टाकून परतून घ्या. आता यात पालकाची पेस्ट, क्रीम व मीठ टाका. एक उकळी येऊ द्या. मिश्रण कोफ्त्यावर टाकून काही मिनिटे मंद आचेवर शिजवा. गरम-गरम सर्व्ह करा.
डाळीचे ढोकरे
साहित्य: 2 कप भिजवलेली चणा डाळ, 1 चौकोनी तुकडे केलेला बटाटा, 1 टीस्पून गरम मसाला , 1 टेबलस्पून धण्याची पेस्ट, 1 टेबलस्पून धणे-जिरे पूड, पाव टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून हळद, पाव कप दही, 2 टेबलस्पून आलं पेस्ट, 3 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून तूप, मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी.
कृती: चणाडाळ, आलं, मीठ व हिरवी मिरची एकत्र करून वाटून घ्या. गरम मसाला, जिरे व धणे एकत्र भाजून वाटा. कढईत तेल गरम करून चणा डाळीचे मिश्रण त्यातील पाणी आटेपर्यंत परतून घ्या. हे मिश्रण तेल लावलेल्या ताटात पसरवा. शंकरपाळीच्या आकारात कापून खरपूस तळून घ्या. कापलेले बटाटे डीप फ्राय करा. उरलेल्या तुपात आलं पेस्ट, भाजलेले गरम मसाले, धणे-जिरे पूड, लाल मिरची, मीठ व दही टाकून परतून घ्या. तळलेले बटाटे व पाणी टाकून शिजवून घ्या. तळलेले ढोकरे टाका. 2-3 मिनिटे शिजवा. ढोकरे शिजल्यानंतर तूप व गरम मसाला टाका. भातासोबत गरम-गरम सर्व्ह करा.