Close

अंकिता लोखंडेचा पतिसोबतचा व्हिडिओ पाहून भडकले प्रेक्षक, म्हणाले अश्लीलतेच्या सर्व मर्यादा पार (Ankita Lokhande Gets Brutally Trolled For Posting Romantic Video With Hubby Vicky Jain)

लग्नानंतर अंकिता लोखंडे खूप आनंदी दिसत असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते. पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत अर्चना म्हणून अंकिता लोकांना खूप आवडली होती. तेव्हा सुशांत सिंह राजपूत तिच्यासोबत होता. त्यावेळेस दोघांनाही एक कपल म्हणून खूप प्रेम मिळाले, पण सुशांतच्या मृत्यूनंतर लोकांनी अंकिताला अनेकदा ट्रोल केले. कधी तिला आनंदी पाहून तर कधी विकी जैनसोबतच्या लग्नाबाबत लोकांनी तिच्यावर ताशेरे ओढले.

अंकिताने पती विकीसोबतचा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यावर पुन्हा तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. अंकिता या व्हिडिओत विकी कौशलच्या तू है तो मुझे फिर और क्या चाहिए या गाण्यावर अभिनय केला आहे आणि नवऱ्याला मिठी मारत आहे. पण लोकांना विकीचे एक्सप्रेशन आणि अंकिताची मांडीवरची पोज आवडली नाही.

अंकिताचे चाहतेही तिच्यावर नाराज होते. अंकिता आम्हाला तू आवडतेस पण असे व्हिडिओ सहन करू शकत नाही, असे युजर्स म्हणत आहे. एका युजरने लिहिले - अपवित्र नाते, एकाने सांगितले की कॅमेरा बंद करून ही छिछोरापंती करा.

लोक अभिनेत्रीला खूप ट्रोल करत आहेत. एकाने लिहिले - 100% नवरा प्रेम करत नाही, त्याने तुमचा प्रसिद्धीसाठी वापर केला आहे. खरे प्रेम असते तर त्याने असा घाणेरडा व्हिडीओ बनवला नसता आणि तुम्हाला बनवू दिला नसता. पुढील 2 वर्षांत घटस्फोटाची घोषणा होईल.

एकाने लिहिले आहे - तुम्ही हे सर्व केवळ प्रसिद्धीसाठी करत आहात, पैशासाठी तुम्ही या माणसाशी लग्न केले आहे. यूजर्स याला अश्लीलतेची मर्यादा मानत आहेत आणि अंकिताला खूप काही सुनावत आहेत. हे सर्व कॅमेऱ्यासमोर जनतेला दाखवण्याची काय गरज आहे, असे लोकांचे म्हणणे आहे.

Share this article