Close

अंजीर बर्फी (Anjeer Barfi )

साहित्य : पाऊण कप बारीक चिरलेले सुके अंजीर, पाऊण कप बारीक चिरलेले खजूर, 2 टेबलस्पून मनुका, 3 टेबलस्पून पाणी, पाऊण कप बारीक चिरलेला सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड), स्वादानुसार वेलची आणि जायफळ पूड, 1 टीस्पून तूप.
कृती : नॉनस्टिक पॅनमध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड कोरडेच भाजून बाजूला ठेवून द्या. त्याच पॅनमध्ये अंजीराचे तुकडे घेऊन त्यावर पाणी शिंपडा आणि मऊ होईपर्यंत परतवा. नंतर त्यात खजूर, मनुका, वेलची आणि जायफळ पूड एकजीव करा. मिश्रण चांगलं एकजीव, दाट आणि चिकट होईपर्यंत परतवा. नंतर त्यात तूप मिसळा. त्यात भाजलेला सुकामेवा मिसळून चांगला एकजीव करा. हे मिश्रण तुपाचा हात लावलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये घालून पसरवा. मिश्रण सारखं करून त्यावरून लाटणं फिरवा. पूर्णतः थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा.
टीप : फ्रीजमध्ये ठेवल्यास अंजीर बर्फी आठवडाभर टिकते.

Share this article