Close

निर्माता-दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या कॉमेडी फिल्म ‘अंदाज अपना-अपना’ ची एक वेगळीच क्रेझ; एप्रिलमध्ये थिएटरमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित होणार (‘Andaz Apna Apna’ to Re-Release in Theatres This April)

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि सलमान खान यांची जोडी ही 'अंदाज अपना अपना' मध्ये दिसली होती. जवळपास ३१ वर्षांनंतर निर्माता-दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या कॉमेडी फिल्म 'अंदाज अपना-अपना' ची एक वेगळीच क्रेझ आहे. हा एक कल्ट सिनेमा आहे. 'अंदाज अपना-अपना' यंदाच्या वर्षी एप्रिलमध्ये थिएटरमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. या सगळ्यांमध्ये सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर चाहते 'तेरे नाम' या चित्रपटाच्या री-रिलिजची मागणी करत आहेत.

आमिर खान आणि सलमान खान यांच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं होतं. राजकुमार संतोषी यांनी या चित्रपटाच्या पुन्हा प्रदर्शित होण्यावर म्हटलं की 'अंदाज अपना-अपना हा चित्रपट माझ्या हृदयाच्या जवळ आहे आणि हे ऐकूण मला खूप आनंद झाला आहे की हा चित्रपट पुन्हा एकदा एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे.'

चित्रपटाचे निर्माता म्हणाले, 'नम्रता, प्रीति, आमोद सिन्हा आणि विनय कुमार सिन्हा यांची मुलं ज्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती, त्यांना हा चित्रपट पुन्हा एकदा भारतीय प्रेक्षकांना थिएटरमध्ये दाखवण्यासाठी तयार आहेत. आम्ही संपूर्ण चित्रपटाला 4K आणि डॉल्बी 5.1 साउंड मध्ये रिस्टोर आणि रीमास्टर केलं आहे.'

पुढे ते म्हणाले, ही आमच्याकडून आमच्या वडिलांना असलेली श्रद्धांजली आहे. ज्यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी सगळे अडथळे पार केले आणि इतका चांगला चित्रपट दिलं. या सगळ्यात सोशल मीडियावर देखील लोकांच्या विविध प्रतिक्रिया दिसून येत आहेत. अनेकांनी कमेंट करत म्हटलं की 'एकदा 'तेरे नाम' देखील प्रदर्शित करा. थिएटरमध्ये दंगली होतील.' दुसरा एक नेटकरी म्हणाला, 'सगळे आनंदानं वेडे होतील. मोठ्या संख्येनं लोक गर्दी करतील.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यास हाऊस फूल असेल.'

दरम्यान, या चित्रपटात रवीना टंडन, करिश्मा कपूर, परेश रावल आणि शक्ति कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट ४ नोव्हेंबर १९९४ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट पुन्हा एकदा भारतात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/