Close

अमृतसरी पनीर व क्रॅकलिंग पनीर (Amritsari Paneer And Crackling Paneer)

अमृतसरी पनीर
साहित्यः 250 ग्रॅम पनीर, अर्धा जुडी पालक, 2 टेबलस्पून मेथी, 3 टेबलस्पून तेल, 5 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, 1 कांदा, 1 टीस्पून जिरे, 2 कप टोमॅटो प्युरी, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार.
कृतीः पालक व मेथी धुवून बारीक चिरून घ्या. कांदा उभा व पातळ चिरून घ्या. लसूण व मिरची कुटून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून जिर्‍याची फोडणी द्या. लसूण टाकून परता. कांदा टाकून परतून घ्या. आता यात टोमॅटो प्युरी, पालक व मेथी घालून 2 मिनिटे शिजवा. इतर मसाले व पनीर टाकून 5 मिनिटे शिजवा. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.

क्रॅकलिंग पनीर
साहित्यः 100 ग्रॅम पनीर, 200 ग्रॅम पालक, चिमूटभर हिंग, प्रत्येकी 2 टीस्पून कॉर्नफ्लोर व मैदा, 5 ग्रॅम छोटी लाल मिरची, 5 ग्रॅम साखर, प्रत्येकी 2 टीस्पून लिंबाचा रस, पांढरे तीळ, मीठ व काळी मिरी पूड चवीनुसार, तळण्यासाठी तेल.
कृतीः पालक धुवून चिरून घ्या. चिरलेला पालक कॉर्नफ्लोर व मैद्यात घोळवून तळून घ्या. यात साखर, छोटी लाल मिरची व पांढरे तीळ मिक्स करा. पनीर कॉर्नफ्लोर व मैद्याच्या मिश्रणात घोळवून तळून घ्या. कढईत लिंबाचा रस व साखर घालून लेमन सॉस बनवा. यात मीठ, काळी मिरी पूड व हिंग घाला. सर्वात शेवटी पनीर घाला. सर्व्ह करताना तळलेला पालक व पनीर वेगवेगळे सर्व्ह करा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/