आलू राजवाडी
साहित्यः 500 ग्रॅम छोटे बटाटे (बेबी पोटॅटो), 300 ग्रॅम टोमॅटो, 10 बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, 20 ग्रॅम बारीक चिरलेलं आलं, 20 ग्रॅम बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून एव्हरेस्ट धणे पूड, 200 ग्रॅम कांदे, 1 टेबलस्पून गरम मसाला, 5 ग्रॅम जिरे, 1 टेबलस्पून तेल व मीठ चवीनुसार.
कृतीः बटाटे मऊ होईपर्यंत उकडून घ्या. हे बटाटे सोलून तळून घ्या. दुसर्या पॅनमध्ये तेल गरम करून जिर्याची फोडणी द्या. नंतर लसूण व कांदा घालून परता. कांदा गुलाबीसर झाल्यानंतर आलं व मिरची घालून परता. आता टोमॅटोची प्युरी बनवून यात घाला. एव्हरेस्ट धणे पूड, लाल मिरची पूड, गरम मसाला व मीठ घालून परता. तळलेले बटाटे व गरजेनुसार पाणी घालून एक उकळी येऊ द्या. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.
कोथिंबीर पुदिना बटाटा
साहित्यः 3 उकडलेले बटाटे, 2 टीस्पून तेल, चिमूटभर हिंग, 4-5 कढीपत्ता, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, पाव टीस्पून हळद, चिरलेली कोथिंबीर, 2 टीस्पून चिरलेला पुदिना, 1 टीस्पून लिंबाचा रस, मीठ चवीनुसार.
कृतीः कढईत तेल गरम करून हिंगाची फोडणी द्या. कढीपत्ता व हिरवी मिरची टाका. कापलेले बटाटे टाका. हळद व मीठ टाकून मंद आचेवर शिजवा. कोथिंबीर, पुदिना व लिंबाचा रस घालून शिजवा.