Close

आलू मसाला आणि पेपरिका बटाटे (Aloo Masala And Paprika Batate)

आलू मसाला
साहित्य: 2 बटाटे, 2 गाजर (बारीक चिरून). 200 ग्रॅम फ्लॉवर चिरून, 1 कांदा (बारीक चिरलेला), 1/4 कप नारळ (किसलेले), 1 टीस्पून ओरेगॅनो, 2 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि मिरी पावडर, 2 चमचे नारळाचे दूध.
कृती: बटाटे धुवून उकडवा पण साल काढू नका. नंतर बटाटे कापून त्याचे चार भाग करा. गाजर आणि फ्लॉवर वाफेवर शिजवा. त्यात बारीक चिरलेला कांदा मीठ, काळी मिरी पावडर, ओरेगॅनो, किसलेले खोबरे आणि लसूण पाकळ्या घाला. एका प्लेटमध्ये चिरलेले बटाटे ठेवा, त्यावर भाज्यांचे मिश्रण घाला, वर नारळाचे दूध घाला.

पेपरिका बटाटे
साहित्य: 250 ग्रॅम बेबी बटाटे (लहान बटाटे) उकडलेले आणि सोललेले
मॅरीनेट करण्यासाठी: 2 चमचे दही, 2 चमचे चिली-गार्लिक सॉस, 1 टीस्पून मोहरी पावडर, 1 टीस्पून लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून आले-हिरवी मिरची पेस्ट, 1 टीस्पून कॉर्नफ्लोर,अर्धा टीस्पून सोया सॉस, 1 टीस्पून पेपरिका (रेड चिली फ्लेक्स), 1/4 टीस्पून काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, गुंडाळण्यासाठी ब्रेड क्रम्स.
कृती: मॅरीनेशनचे सर्व साहित्य मिक्स करावे. त्यात बटाटे चांगले मॅरीनेट करून तासभर बाजूला ठेवा. नंतर ब्रेड क्रम्समध्ये गुंडाळा. ते सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत तळा आणि टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/