साहित्य : 100 ग्रॅम बदाम (5-6 तास भिजवून, नंतर सालं काढलेले), 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ, 4 टेबलस्पून तूप,
100 मि.लि. दूध, 80 ग्रॅम साखर, 2 टेबलस्पून मिश्र सुकामेव्याचे काप, चिमूटभर वेलची पूड.
कृती : बदाम मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून त्यात बदामाची पेस्ट व गव्हाचं पीठ घालून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत परतवा. नंतर त्यात दूध, मिश्र सुकामेवा, वेलची पूड आणि साखर घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या. साखर मिश्रणात व्यवस्थित एकत्र होऊन, ते शिजलं की आचेवरून उतरवा आणि गरमागरम सर्व्ह करा.
Link Copied