बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. आलियानं यावेळी तिच्या लहाणपणापासूनच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. तर रणबीरनं राहाचं नाव कसं ठेवलं याविषयी सांगितलं. त्याविषयी सविस्तर सांगत आलियानं मुलाच्या नावाचा देखील खुलासा केला आहे. त्यामुळे आलिया आणि रणबीर हे लवकरच दुसऱ्या बाळाची प्लॅनिंग करू शकतात अशी चर्चा रंगली आहे.
आलियानं जय शेट्टीच्या पॉडकास्टला ही मुलाखत देताना याबाबतचा खुलासा केला आहे. आलियानं सांगितलं की तिनं आणि रणबीर कपूरच्या कुटुंबानं आधीच मुलीसाठी नाव ठरवलं होतं. रणबीरची आई नीतू कपूर यांनी राहाचं नाव सुचवलं होतं आणि सांगितलं होतं की जर पुढे राहाला भाऊ झाला तर त्याला हे नाव शोभेल. त्या दोघांना एकमेकांची नाव जुळतील.

आलियानं सांगितलं की मला वाटतं की हे सगळं तेव्हा झालं होतं जेव्हा रणबीर आणि मी आम्ही दोघं उत्सुक असलेल्या आई-वडिलांप्रमाणे आमच्या फॅमिली ग्रुपवर मुला-मुलींची नावं सुचवण्यास सांगत होतो. सगळे त्यांना वाटतात ती नावं सुचवत होते. त्यावेळी आम्ही त्यातून एक मुलीचं नाव ठरवलं. आम्हाला मुलाचं एक नाव खूप आवडलं. आम्ही विचार केला की पुढे जाऊन जेव्हा आमचं दुसरं बाळ होईल तेव्हा आम्ही ते नाव ठेवणार. महत्त्वाचं म्हणजे मी आता ते नाव तुम्हाला सांगणार नाही.
त्यानंतर आलियाला जेव्हा राहाच्या नावाचा अर्थ विचारण्यात आला तेव्हा तिनं हसत राहा नावाचा अर्थ आनंद आणि शांतीचे प्रतीक आहे. जे सगळं ती आमच्यासाठी आहे. काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आलिया आणि रणबीरनं एप्रिल 2022 मध्ये लग्न केलं. तर नोव्हेंबर 2022 मध्ये राहाचा जन्म झाला.

दरम्यान, या मुलाखतीत आलियानं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यात तिनं सांगितलं की तिला जेव्हा वाईट वाटतं तेव्हा ती तिच्या बेडरूमच्या मागे असलेल्या गॅलरीत जाते आणि इतर लोकांच्या घरात ढुंकूण पाहते की ते काय करत आहेत.
आलिया भट्ट प्रमाणेच तिची मुलगी राहा देखील मीडियाच्या चर्चेत असते. राहाचा कोणताही फोटो बाहेर आला की तो इंटरनेटवर व्हायरल होतो. निळ्या डोळ्यांच्या गोंडस राहाची एक झलक पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.