Close

या गंभीर आजाराने त्रस्त आहे आलिया भट्ट; स्वतःच दिली माहिती (Alia Bhatt Is Suffering From Serious Disease )

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘जिगरा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा सिनेमा कमाईमुळे चर्चेत होता. चित्रपटाला प्रेक्षकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. सध्या आलिया चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त वेगवेगळ्या पोर्टल्सला मुलाखती देताना दिसत आहे. अशातच अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिला जडलेल्या आजाराबद्दलची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने दिलेल्या मुलाखतीत तिला ADHD नावाचा आजार झाल्याची माहिती दिली आहे.

ADHD म्हणजेच Attention Deficit Hyperactivity Disorder होय… अभिनेत्रीने मुलाखतीत आपल्या आजाराबद्दल सांगितले की, “मला ADHD या आजाराबद्दल आधीपासूनच माहिती आहे. शाळेत असताना आम्ही मित्र- मैत्रिणी क्लासरूममध्ये गप्पा मारत बसायचो. त्यावेळी मी अचानक उठून बाहेर जायची. माझी अशी वागणूक पाहून माझे मित्र माझ्याकडे पाहत बसायचे. या आजारामुळे मी कॅमेऱ्यासमोर कायमच प्रेजेंटेबल असते. जेव्हाही मी राहासोबत असते, त्यावेळी मी स्वत:ला सर्वात शांत फिल करते.” आलियाने मुलाखतीमध्ये आजाराबद्दल काही माहिती दिली नाही.

 ADHD हा आजार एक न्यूरोडेव्हलपमेंटल स्थिती आहे. जो कोणालाही बालपणीच होतो. त्याच्यावर व्यवस्थित उपचार घेतल्यास तो लवकर जातो, पण जर व्यवस्थित उपचार नाही घेतले तर, आयुष्यभर तो आजार कायम राहतो. या आजारामुळे व्यक्तीचे दैनंदिन काम आणि लाईफस्टाईलवर मोठा परिणाम होतो. याचा त्रास असलेल्या व्यक्तीला कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. ती व्यक्ती एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू शकत नाही. या आजारामुळे आलिया भट्टने तिच्या लग्नात मेकअप आर्टिस्टला ४५ मिनिटापेक्षा जास्त वेळ तयारी करु दिली नव्हती. ADHD या आजारामुळे आलिया जास्त मेकअप करत नाही.

ADHD आजार असलेल्या मुलांमध्ये, बालपणापासूनच आजाराचे लक्षण दिसून येते. ती मुलं इतर मुलांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वागतात. अस्वस्थता, व्यवस्थित झोप न पूर्ण होणे आणि चिंता यासारख्या गंभीर आजारांनी ते ग्रासलेले असतात. ADHD आजाराने ग्रस्त असलेले लोकं अनेकदा अस्वस्थ असतात, ते कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करत नाहीत. रागाच्या भरात ते काहीही करू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, जेव्हा मुले १२ वर्षांची होतात तेव्हा त्यांच्यावर या आजाराचे उपचार केले जातात. काही जणांवर हे अगदी लहान वयातही उपचार केले जातात. पण जसजसे वय वाढत जाते. आणि जर यावर उपचार केले नाहीत तर हा आजार वय वाढल्यावर तसाच राहू शकतो.

ADHDने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी, कोणताही इलाज नाही, परंतु आवश्यक असल्यास औषधोपचार तसेच पालक आणि प्रभावित मुलांसाठी योग्य शैक्षणिक समर्थन, सल्ला आणि समर्थनाद्वारे त्याचे व्यवस्थापन केले जाऊ शकते.

Share this article