आलिया भट्टने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिची मुलगी राहाचे सर्व फोटो डिलीट केले आहेत ज्यात तिचा चेहरा दिसत होता. मात्र, आलियाने असे का केले याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण सोशल मीडिया वापरकर्ते म्हणतात की कदाचित तिने सैफ अली खानवरील हल्ला लक्षात घेऊन हे पाऊल उचलले असेल.
खरंतर, आलियाने तिच्या इंस्टाग्रामवरून फक्त तेच फोटो डिलीट केले आहेत ज्यात तिची मुलगी राहाचा चेहरा दिसत होता. नवीन वर्षाच्या फोटो अल्बममध्ये राहाचा फोटो आहे, पण तिचा चेहरा त्यात दिसत नाही.

नेटकऱ्यांनी आलियाच्या या निर्णयाचं कौतुकच केलं आहे. एका सोशल मीडिया वापरकर्त्याने आलियाला आपला १०० टक्के पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. तर 'एक पालक म्हणून, सुरक्षिततेच्या कारणास्तव हे पाऊल उचलले पाहिजे.', असे दुसऱ्याने लिहिले, 'प्रामाणिकपणे, हा एक चांगला आणि योग्य निर्णय आहे.' मला आशा आहे की वाईट प्रवृत्तीचे लोक हे समजून घेतील आणि त्रास देणार नाहीत.', याशिवाय, अनेक लोकांनी यावर टीकाही केली आहे.

नीतू कपूर नुकतीच करीना कपूरचा धाकटा मुलगा जेहच्या वाढदिवसाला तिची नात राहासोबत उपस्थित राहिली. यावेळी त्यांनी पापाराझींना राहाचे फोटो क्लिक करू नयेत असे आवाहन केले होते. याशिवाय, करीना कपूरनेही मुलांचे फोटो न काढण्याची विनंतीही केली. तथापि, यापूर्वी कपूर कुटुंबाने त्यांच्या मुलांना माध्यमांशी संवाद साधण्यापासून कोणतेही बंधन घातले नव्हते.




आलिया भट्टची मुलगी राहा अनेकदा मीडियाच्या चर्चेत असते. राहाचा कोणताही फोटो बाहेर आला की तो इंटरनेटवर व्हायरल होतो. निळ्या डोळ्यांच्या गोंडस राहाची एक झलक पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.