Close

किशोरवयीन मुलींना अभिनेत्री स्मिता बन्सलचे मार्गदर्शन : मुलींसह पालकांचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या टिप्स (Actress Smita Bansal Give Lessons To Teenage Girls: She Aims To Gain Confidence In Girls And Their Parents As Well)

सगळ्या पालकांची इच्छा असते की आपल्या किशोरवयीन मुलीसोबत आपले घट्ट भावनिक संबंध विणले जावेत. मुलीच्या भल्या-बुऱ्या दिवसांमध्ये त्यांना साथ देत हे बंध आणखी घट्ट होत जावेत. मुली वयात येत असताना काळ बदलत असतोच शिवाय त्यांच्या भोवतीच्या सगळ्या गोष्टी बदलत असतात. या बदलणाऱ्या गोष्टी आपल्यालाही समजाव्यात, मुलीच्या भावविश्वात आपल्यालाही प्रवेश मिळावा आणि नवी परिस्थिती ती समजावून सांगत असताना आपणही ती समजून घेण्यासाठी पालक प्रयत्न करत असतात.  मुलींसोबतचे हे क्षण देखील पालकांच्या कायमस्वरुपी लक्षात राहणारे असतात.

किशोरवयीन मुलींच्या बदलत्या विश्वात त्यांना काय सांगायचं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांचे म्हणणे नीटपणे ऐकून घेणे गरजेचे आहे. त्यांना जे सांगायचे आहे त्यावर आपली मते न लादता आपण मुलींच्या पाठीशी आहोत हे त्यांना सांगणे गरजेचे असते. किशोरवयीन मुलींच्या आयुष्यात रोज काहीतरी उतार चढाव येत असतात. त्यासाठी त्यांना साथ देणे, दु:खाचा प्रसंग असल्यास आधार देणे आणि आनंदाचा प्रसंग असल्यास त्यांच्या आनंदात सहभागी होणे  हे गरजेचे असते. तुम्ही कामावर जाणारे पालक असाल किंवा घरी थांबून घराची काळजी घेणारे पालक असाल, घर आणि मुलांची काळजी घेणे ही तारेवरची कसरत असते. ही कसरत करत असताना अनेक अडथळे, आव्हाने येत असतात.  हे अडथळे आणि आव्हाने पार करत असताना आलेले अनुभव मी आपल्यासोबत शेअर करू इच्छिते आहे. हे अनुभव किशोरवयीन मुलींच्या पालकांसाठी फार उपयोगी ठरू शकतात. कारण या वयातील मुलींशी वागणं हे पालकांसाठी अनेकदा गुंतागुंतीचे, तणावाचे आणि काही अवघड निर्णय घेण्यासाठी भाग पाडणारे ठरू शकते.

किशोरवयीन मुलीला तिच्यात असलेल्या वेगळेपणाची आणि तिच्या स्वत्व:ची जाणीव करून देण्याची हीच योग्य वेळ असते. तुमच्या किशोरवयीन मुलीतील चांगल्या गोष्टींसाठी आणि तिच्या कलागुणांचे कौतुक केले पाहिजे. तिच्या स्वभावातील चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिले पाहिजे.  समाजाला तुमच्या मुलीकडून भरपूर अपेक्षा असू शकतील. या अपेक्षांच्या ओझ्याखाली ती गुदमरून जाऊ नये याची काळजी घ्या. तुमची स्वत:ची मते तिच्यावर लादू नका आणि इतरांशी तुलना करून तिला दुखावू नका. एक पालक म्हणून, तुम्ही तिची स्वत:ची वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि तिच्या आवडींच्या गोष्टींचा मनापासून पाठपुरावा करण्यासाठी तिला सक्षम करणे हे गरजेचे आहे.

पालक होण्यासारखा या जगात दुसरा आनंद नाही. अनेकांनी तुम्हाला ही बाब सांगितली आहे. मात्र नुसतं पालक होऊन उपयोगाचे नसते तर चांगले पालक होणे हे गरजेचे असते. 'कोटो' सारख्या मंचावरील समूह हे सशक्त आणि पाठबळ देणारे ठरतात. इथे आपण मुक्तपणे संवाद साधू शकतो आणि आपल्या समस्यांवर उत्तरे मिळवू शकतो. अशा मंचांवरील संवादातून खूप साऱ्या नव्या गोष्टी समजत असतात, नवे अनुभव कळत असतात आणि त्यातून आपल्या किशोरवयीन मुलीसंदर्भात आपल्याला भेडसावत असलेल्या प्रश्नांची उत्तरेही मिळू शकतात. तज्ज्ञ मंडळी पालकांशी इथे संवाद साधता येतो, विशेष बाब म्हणजे इथले संभाषण हे अत्यंत निर्मळ, सशक्त आणि कोणाचीही उणी-दुणी काढण्यासाठी नसतं. इथल्या संवादामुळे आणि त्यातून मिळालेल्या उत्तरांमुळे काळजीत पडलेल्या असंख्य पालकांची काळजी दूर होण्यास मदत होते. इथल्या संवादामुळे पालक आपल्या मुलीकडे फार चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकतात आणि तिला एक उत्तम व्यक्ती, नागरीक बनविण्यासाठीही प्रयत्न करू शकतात.

मुक्त संवाद : अनेकदा पालकांनी नुसते ऐकणे हे खूप गरजेचे असते. यामुळे किशोरवयीन मुलींसोबत आपण मुक्त आणि प्रामाणिक संवाद साधू शकतो. या वयातील मुली मोकळेपणाने बोलू शकल्या नाही तर त्या स्वत:ला त्याचा दोष देऊन टोकाची पावले उचलण्याची भीती असते. त्यांनी वयात येत असलेल्या मुलीला आपल्यासोबत मोकळेपणाने बोलता येईल असे वातावरण तिला तयार करून देणे गरजेचे असते. ती तिची मते मांडत असताना भावना व्यक्त करत असता तिला मोकळेपणाने बोलू देणं गरजेचे असते. बोलताना तिला मध्येच अडवणं, तिच्या चिंतांची किंवा अडचणींची खिल्ली उडवून दुर्लक्ष करणं अशा गोष्टी करू नयेत.  आपले पालक आपलं ऐकतात, आपली काळजी घेतात हे मुलीला कळाल्यानंतर आपल्यासोबतचे तिचे बंध अधिक घट्ट होण्यास मदत होते.

पाठिंबा आणि मोकळीक:  मुलींना त्यांचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्याचवेळी त्यांना त्यांच्या आयुष्यात भक्कम पाठिंबा पण असला पाहिजे. पालकांनी मुलींना तिच्या वयानुसार जबाबदारी घेण्याचे आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. मुलींना आपण घेतलेल्या निर्णयामुळे काय परिणाम होतात हे पाहता येतात आणि त्यातून त्या शिकत असतात. हे त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचे असते.  तिच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी तिला पाठिंबा दिला पाहिजे.  मुलींची काळजी घेत असताना त्यांना पाठिंबा आणि स्वातंत्र्यही देणे गरजेचे असते. जेणेकरून त्यांना स्वावंलंबी जीवनाचा मार्ग सापडण्यास मदत होईल.

दरवेळी पालक हे काही मुलींचे मित्र असतातच असे नाही, तसे विनाकारण असण्याचीही गरज नाही. मात्र वर दिलेल्या ५ मंत्रांचा वापर करून तुम्ही तुमच्या तरुण मुलीसोबतचे भावनिक, मानसिक बंध अधिक बळकट करू शकता.  हे प्रेमळ बंध बळकट झाल्याने मुली पौगंडावस्थेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांचा पाया बळकट झालेला असतो, ज्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत होण्यास मदत होते आणि त्यांचा जीवनातील पुढील प्रवास सुखकर होण्यासही मदत होते.

सदर लेख हा अभिनेत्री आणि 'कोटो'वर 'डिअर मॉम्स ऑफ टीन्स' नावाची कम्युनिटी चालवणाऱ्या स्मिता बन्सल यांनी लिहिला आहे.

Share this article