Close

पूनम पांडेच्या खोट्या मृत्येचे सत्य उघड होताच अभिनेत्रीचा राग अनावर, सोशल मीडिया पोस्ट शेअर करत सुनावले खडेबोल ( Aarti Singh Get Angry After Poonam Pandey’s fake death revealed)

पूनम पांडेचे मृत्यूचे नाटक समोर आल्यापासून सोशल मीडियावर सर्वजण राग व्यक्त करत आहेत. आता द कपिल शर्मा शो फेम कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहने सोशल मीडियावर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली.

आरती सिंहने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, 'हे वाईट आहे, ही कोणतीही जनजागृती नाही. माझा जन्म झाला तेव्हा या कॅन्सरमुळे मी माझी आई गमावली. पुढे कॅन्सरमुळे मी माझे वडीलही गमावले, माझी आई डॉक्टरांना विनंती करायची, कृपया मला वाचवा, माझ्या मुलीचा नुकताच जन्म झाला आहे, मला एक वर्षाचा मुलगा आहे. तू जनजागृती करत नाहीस, तर खोटं पसरवत आहेस, तू हॉस्पिटलमध्ये जा आणि बघ की लोक त्यांच्या जीवाशी कसे लढत आहेत.

ती म्हणाली, 'हे अजिबात मान्य नाही, तू सर्वांच्या भावनांशी खेळलीस. तुला लाज वाटली पाहिजे, लोक कोणत्या स्तरावर जाऊ शकतात हे धक्कादायक आहे. तुमच्यासाठी, रेस्ट इन पीस हा फक्त एक शब्द आहे. जा आणि त्या लोकांना विचार ज्यांनी आपली माणसे गमावली आहेत. तू सोशल मीडियाचा वापर जनजागृतीसाठी नव्हे तर खोट्या आणि फसवणुकीसाठी करत आहे. खराब पीआर स्टंट.

पूनम पांडेने काही व्हिडीओ शेअर करून आपल्या मृत्यूच्या नाटकामागी कारण सांगितले. ती म्हणाली की, 'मी जिवंत आहे. सर्वाइकल कॅन्सरमुळे माझा मृत्यू झाला नाही. पण दुर्दैवाने सर्वाइकल कॅन्सरमुळे ज्या लाखो महिलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगू शकत नाही. अभिनेत्री म्हणाली, 'मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आले आहे की इतर कर्करोगांप्रमाणेच सर्वाइकल कॅन्सर टाळता येऊ शकतो. तुम्हाला फक्त सर्व चाचण्या करायच्या आहेत आणि HPV लस घ्यायची आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/