Close

आमिर खानच्या लेकाला निरुपयोगी समजतात घरचे, जुनैद खानने सांगितला आयराच्या लग्नाचा किस्सा (Aamir Khan Son Junaid Khan Says He Sat Outside During Sister Ira Wedding Because His Family Thinks He Is Useless)

बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खान सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. त्याच्या आगामी 'लवयापा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या जुनैद खानने अलिकडच्या एका मुलाखतीत खुलासा केला की त्याचे कुटुंबीय त्याला निरुपयोगी मानतात.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या ताज्या मुलाखतीत जुनैद खानने सांगितले की, त्याची बहीण आयराचे लग्न होत असताना तो बाहेर बसला होता. एवढेच नाही तर त्याने असेही सांगितले की त्याचे वडील आमिर खान यांनीही त्याला सांगितले होते की जर तू कधी लग्न करण्याचा विचार करत असेल तर तू पळून जाऊन लग्न केले पाहिजे.

बहीण आयराच्या लग्नात, कुटुंबातील सदस्यांनी त्याला कोणतेही काम दिले नाही. कारण तो निरुपयोगी आहे असे त्याच्या घरच्यांना वाटते. जुनैदकडून कोणालाही कामाची अपेक्षा नव्हती हे आयराला चांगलेच माहीत होते आणि म्हणूनच मला कोणीही कोणतेही काम दिले नाही. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मला सांगितले की लग्न अमुक अमुक तारखेला आहे आणि हीच ती वेळ आहे आणि मी यावेळी तिथे पोहोचले पाहिजे. त्यांना वाटले की जर मला कोणी काम दिले आणि मी केले नाही तर...

एवढेच नाही तर त्याने असेही सांगितले की त्याचे वडील आमिर खान यांनीही त्याला सांगितले होते की जर तू कधी लग्न करण्याचा विचार करत असशील तर तू पळून जाऊन लग्न केले पाहिजे.

जुनैदने सांगितले की, त्याचे वडील घरी पार्टी करतात तेव्हाही तो बाल्कनीत बसतो. त्याला पार्टी करायला आवडत नाही. त्याला लोक एकत्र जमणे आणि मोठ्या आवाजात संगीत वाजवणे आवडत नाही.

जुनैद खान आणि खुशी कपूर यांचा पुढचा चित्रपट 'लवयापा' २७ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. दोन्ही स्टार किड्स त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. विशेष म्हणजे जुनैद खान आणि खुशी कपूर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे जो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे.

Share this article