Close

‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने सुरू केला नवीन व्यवसाय (Aai Kuthe Kay Karte Fame Actress Apurva Gore Started New Business)

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत अरुंधतीच्या मुलीची म्हणजेच ईशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरेने अभिनय क्षेत्र सांभाळून वैयक्तिक आयुष्यात मोठा निर्णय घेत व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सर्वांची लाडकी ईशा आता बिझनेसवुमन झाली आहे. मात्र, अपूर्वाने कपड्यांच्या किंवा हॉटेल क्षेत्रात पदार्पण न करता एक आगळावेगळा व्यवसाय सुरू केला आहे.

अपूर्वाने ‘Raahat’ या नावाने कँडल्सचा म्हणजेच मेणबत्ती विकण्याचा बिझनेस सुरू केला आहे. पण, अपूर्वाने बनवलेल्या कँडल्स या साध्या नसून त्या विशिष्टप्रकारे डिझाइन केलेल्या आहेत. मोतीचूर लाडू, फुलांचा आकाराच्या अशा वैविध्यपूर्ण डिझाइन्सच्या कँडल्स तयार करून ती हा व्यवसाय करत आहे.

अपूर्वाने तिच्या नव्या व्यवसायाचं नाव व लोगो असलेली पोस्ट शेअर करत “आयुष्यातील कठीण काळात आपल्याला सर्वांना एक सकारात्मक प्रकाश हवा असतो. यासाठी तुम्हा सर्वांबरोबर एक खास गोष्ट शेअर करतेय… तर, हा आहे माझा नवीन ब्रँड ‘Raahat’ By अपूर्वा” अभिनेत्रीने बनवलेल्या अनोख्या कँडल्स अगदी खरेखुरे मोतीचूर लाडू तर नाहीत ना असा गैरसमज अनेकांचा होतोय. त्यामुळे तिच्या अनोख्या कौशल्याचं सर्वजण विशेष कौतुक करत आहेत.

सोबतच मधुराणी प्रभुलकर, अश्विनी महांगडे, अश्विनी कासार, सीमा घोगळे, गौरी कुलकर्णी या अभिनेत्रींनी कमेंट्स करत अपूर्वाला या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this article