Close

गणेशोत्सवातील आरत्या कुणी रचल्या? त्या मागची गोष्ट काय? याचा उलगडा करणारा वेगळा कार्यक्रम (A Special Program Explaining The Stories Behind Various Prayers Of Ganeshotsav Will Telecast Soon)

गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२३ या गणपती विशेष कार्यक्रमाची यंदाची थीम आहे आरती घराघरातली.

ज्या आरत्या आपण मनोभावाने म्हणतो त्या आरत्या रचल्या कुणी आणि त्यामागची गोष्ट या कार्यक्रमातून दाखवण्यात येईल. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी या कार्यक्रमासाठी काही आरत्यांना नव्याने संगीतबद्ध केलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे स्पर्धक आणि प्रवाह परिवारातल्या कलाकारांनी मिळून बाप्पाच्या आरत्या नव्या अंदाजात सादर केल्या आहेत.

या गणपती विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडलीय मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील सार्थक आणि अबोलीने. गणरायाच्या या जल्लोषात निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यातली धमाल जुगलबंदी कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवणार आहेत. हा कार्यक्रम येत्या रविवारी २४ सप्टेंबरला स्टार प्रवाहवर सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित होईल.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/