Close

दिग्पाल लांजेकर यांनी मुक्ताई सिनेमानिमित्त घेतली उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट, सांगितला अविस्मरणीय अनुभव (Digpal Lanjekar meets the Chief Minister of Uttar Pradesh on the occasion of the movie Muktai, recounted an unforgettable experience)

दि. ३० मार्च २०२५ , आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ यांचा दूरध्वनी आला. योगींना भेटायचे आहे. म्हटले “सांगा कुठे येऊ ?” ते म्हणाले “योगी म्हणजे मी नव्हे ! योगी आदित्यनाथ , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री .” मी तातडीने होकार भरला आणि अजय दादा (पुरकर) ला सोबत घेऊन लखनौ ला पोचलो. दि. ३१ ची सकाळी ११. १५ ची भेटीची वेळ मिळाली होती. आणि केवळ ५ मिनिटासाठी मिळाली होती .

अनेक विचार डोक्यात घेऊन लखनौ च्या मुख्यमंत्री आवासात पोचलो. आणि गेल्या गेल्या कळले कि दिवसाभरातली आमचीच पहिली भेट आहे. काही काळ निरंजन नाथांशी अन्य विषयावर बोलणे झाल्यावर माझ्याकडे योगी आदित्यनाथांनी सहज हसून पाहिले आणि चौकशी केली . ज्ञानोबारायांचे स्मरण करून त्यांना “संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई” सिनेमा बद्दल सांगायला सुरुवात केली. पोस्टर पुढे करत म्हणालो “ आता महाराष्ट्राच्या संत परंपरेवर आधारित सिनेमा बनवत आहे. संत ज्ञानेश्वरांची ... “ इतक्यात समोरून ते उदगारले “ मुक्ताई !... अर्थात उनकी छोटी मातृतुल्य बहन!” मी आणि अजय दादा ने विस्मयाने एकामेकाकडे पाहिले. तोवर “आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा...” हि ओवी त्यांनी आम्हाला ऐकवली आणि म्हणाले कि “इतिहासाशी प्रतारणा ना करता हे सगळं दाखवायची इच्छा आणि प्रामाणिकपणा पाहिजे” त्यावर जरा धीर करून मी म्हटलं कि “एक कच्चा ट्रेलर आम्ही सोबत आणला आहे. अनुमती असेल तर दाखवतो.”

त्यांनी क्षणाचाही विलंब ना करता दाखवा म्हटलं. अतिशय श्रद्धेनं त्यांनी ट्रेलर पूर्ण पाहिला. चित्रपटातील ज्ञानेश्वर माउली मुक्ताबाईंना कुंडलिनी अभ्यास शिकवतात, मुक्ताई मातेचे अध्यात्मातील अधिकार दाखवणारे प्रसंग, नाथसंप्रदायाचा इतिहास अशा प्रसंगांवर वर दाद दिली . त्यानंतर ज्या नाथ संप्रदायाचे ते पाईक आहेत , तो नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांचा अलौकिक संबंध , त्या सगळ्या क्रांतीत या चारही भावंडांचं योगदान यावर भरभरून बोलले. समोर बसलेली व्यक्ती एक अभ्यासू साधक आहे , हे क्षणाक्षणाला जाणवत होतं. भेटीअंती आवर्जून म्हणाले “यह निर्मिती तो अत्यन्त सुंदर हुई है ... इसी तरह से धर्म और भारतीय तत्वज्ञान के प्रति प्रामाणिकता से कार्य करते रहो. इस प्रकार संतों के कार्य दिखाने वाली और भी फिल्मे बनाइये । आपका कल्याण हो।”


परतताना मनात केवळ हेच येत होत “सगळं माऊलींचं आहे, मुक्ताईच आहे… माझे केवळ पाईकपण 🙏🏻”
।।राम कृष्ण हरी ।।

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/