मराठी अभिनेता स्वप्नील जोशीनी न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याला आलेल्या प्रेक्षकांचा अनुभव शेअर केला. स्वप्निलने रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण मालिकेत कृष्णाची भूमिका साकारली होती. तेव्हापासून तो लोकप्रियतेच्या शिखरावर चढला. दरम्यानच्या काळात त्याने अनेक मालिका व सिनेमांमध्ये काम केले. पण प्रेक्षकांच्या मनातली ती भूमिका अजून पुसलेली नाही.
स्वप्निल म्हणाला की, मला रोज कोणीतरी भेटतच. रोज एक तरी माणूस माझे पाय धरून म्हणतो की कृष्ण तुम्हीच आहात ना. मला असं वाटतं की जोपर्यंत मी नाही तोपर्यंत हे राहणार आहे. मला सार्थ अभिमान आहे की ते आहे. तू माझ्या असण्याचा अस्तित्वाचा एक भाग आहे. हल्ली नूडल्स २ मिनिटात तयार होतात. हा आपला रेकॉल आहे. इथे जर ३०-४० वर्षांपूर्वी केलेल्या काम काल केल्यासारखं आठवतंय तर तो आशीर्वादच आहे असं मला वाटतं.
स्वप्निल जोशी च्या कामाबद्दल बोलायचे झाले असते शेवटचा बूम चिकी चिकी बूबूम बूम या सिनेमात दिसलेला. त्यानंतर आता त्याचा सुशीला सुजीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमा त्याच्यासोबत प्रसाद ओक आणि सोनाली कुलकर्णी हे प्रमुख भूमिकेत असतील तर यांच्याशिवाय सुनील तावडे रेणुका दप्तरदार सुनील गोडबोले यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळतील.