आज, स्टोअरमध्ये असो, ऑनलाइन किंवा चालता-फिरता आर्थिक व्यवहार करायचा असो #IndiaPaysDigitall ला अधिक प्राधान्य दिले जात आहे. यंदा डिजिटल पेमेंट्स अवेअरनेस वीक व त्यापलीकडे देखील स्मार्टपणे, सुरक्षितपणे डिजिटल पेमेंट्स करण्यासाठी व्हिसाच्या या टिप्सचा वापर करा:
- सुरक्षित कॉन्टॅक्टलेस पेमेंट्ससाठी फोनवर कार्डस् सेव्ह करा : बँकिंग व पेमेंट अॅप्समध्ये आता कार्ड क्रेडेन्शियन्स स्टोअर करता येऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही तुमचा फोन टॅप करू शकता आणि कार्डसचा वापर करत पेमेंट करू शकता.
- नेहमी सुरक्षित पेमेंट पद्धतींचा वापर करा: सुरक्षित व विश्वसनीय डिजिटल पेमेंट पद्धतींची निवड करा, ज्यामुळे व्यवहारांसाठी एन्क्रिप्शन, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आणि टोकनायझेशनच्या अतिरिक्त सुरक्षिततेसह फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.
- कॉन्टॅक्टलेस कार्डचा वापर करा : ईएमव्हीसीओ® चिप-आधारित कॉन्टॅक्टलेस कार्डससह (तुमच्या कार्डवर वाय-फाय सारखे चिन्ह पहा) तुम्ही कार्ड हातामध्येच ठेवत पीओएस टर्मिनलवर तुमचे कार्ड टॅप करत जलदपणे, सुरक्षितपणे पेमेंट्स करू शकता.
- बँकिंग अॅप्सच्या माध्यमातून व्यवसहारांवर नियंत्रण ठेवा: तुमच्या बँकिंग अॅपमधून सोईस्करपणे कॉन्टॅक्टलेस, ई-कॉमर्स, एटीएम विद्ड्रॉवल्स आणि आंतरराष्ट्रीय कार्ड व्यवहार कार्यान्वित किंवा अकार्यान्वित करा. तुम्ही खर्चाच्या मर्यादा देखील आखू शकता आणि तुमचे कार्डस् कसे व कुठे वापरावे यावर नियंत्रण ठेवू शकता.
- रिअल टाइम अलर्टससह व्यवहारांवर देखरेख ठेवा : तुमच्या बँकिंग व पेमेंट अॅप्सच्या माध्यमातून रिअल-टाइममध्ये त्वरित नोटिफिकेशन्स मिळवत आणि व्यवहारांवर देखरेख ठेवत प्रत्येक खर्चाबाबत अपडेटेड राहा.
- क्रेडिट कार्ड पेमेंट्ससह फायदे वाढवा: तुमचे बँक व पेमेंट प्रदात्यांकडून कॅशबॅक ऑफर्स, रिवॉर्ड पॉइण्ट्स आणि विशेष सूटचा फायदा घ्या. तसेच, प्रत्येक व्यवहारावर अधिक फायदे मिळवण्यासाठी ईएमआय पर्याय आणि मोफत सूटचा स्मार्टपणे वापर करा.
जलद, सुरक्षित आणि अधिक सोईस्कर अनुभवासाठी या टिप्ससह तुमच्या डिजिटली पेमेंट करण्याच्या पद्धतींना अधिक सुरक्षित करा.
Link Copied