आपल्या माणसांचा आपला सोहळा अर्थात स्टार प्रवाह परिवार पुरस्काराची अवघा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत आहे. प्रवाह परिवारासोबतच यंदा आणखी एका खास व्यक्तीच्या हजेरीने सोहळ्याची रंगत आणखी वाढणार आहे. ही खास व्यक्ती म्हणजे लाखो हृदयांची धडकन अर्थातच माधुरी दीक्षित. आपल्या अभिनय आणि नृत्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी धकधक गर्ल स्टार प्रवाह परिवार पुरस्कारासाठी अवतरली आणि आपल्या अदाकारीने तिने सर्वांची मनं जिंकून घेतली.


माधुरी आणि त्यांचं नृत्यावरील प्रेम सर्वश्रुत आहेच. माधुरीच्या एनर्जीला तोड नाही. तिच्याकडून नृत्याचे धडे घेणं म्हणजे पर्वणीच. यावेळेस साक्षात माधुरीसमोर नृत्यकला सादर करुन तिला इम्प्रेस करण्याची संधी स्टार प्रवाहच्या कलाकारांनीही सोडली नाही. प्रवाह परिवारातल्या एका लकी सदस्याला माधुरीकडून एक खास भेटवस्तू मिळणार आहे. हा लकी सदस्य कोण? आणि या लकी सदस्याला नेमकं काय मिळणार? हे लवकरच कळेल.