Close

जल संधारण उपक्रमाने श्री. संजय खोत यांची शेती व समुदायामध्‍ये परिवर्तन घडवून आणले (water conservation project Help For Good Farming)

किनारपट्टीवरील घोलवड गावामधील ४६ वर्षीय शेतकरी संजय खोत यांना दशकभराच्‍या कष्‍टाचे फळ मिळाले आहे. पाण्याची क्षारता आणि वाढत्या टंचाईमुळे या प्रदेशाचा शेतीचा कणा असलेल्या चिकूची लागवड अधिकाधिक आव्हानात्मक बनत गेली. दरवर्षी, उन्‍हाळा जवळ आला की संजय आणि इतर शेतकऱ्यांना अनिश्चित भविष्याचा सामना करावा लागायचा, ते त्यांच्या सिंचन गरजा पूर्ण करण्यासाठी धरणातून मिळणाऱ्या महागड्या आणि अविश्‍वसनीय पाण्यावर अवलंबून राहत होते.
''पूर्वी, आम्हाला पाणी आणण्यासाठी मैलभर चालावे लागायचे आणि आमच्या पिकांचे नुकसान होत होते,'' असे संजय जुन्‍या आठवणींना उजाळा देत म्‍हणाले.
टाटा मोटर्सच्या नाविन्यपूर्ण जलसंधारण उपक्रमामुळे हा महत्त्वाचा टप्पा आला. टाटा मोटर्सने महाराष्‍ट्र सरकारसोबत सहयोगाने पालघर जिल्ह्यातील जलसाठ्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली. घोलवड गावामधील सध्‍याचा तलाव स्वच्छ आणि गाळमुक्‍त करण्यात आला, ज्यामुळे जवळपास ४ कोटी लीटर पाण्याची क्षमता पुनर्संचयित झाली आणि समुदायाच्‍या भविष्‍याला नवसंजीवनी मिळाली.


एकेकाळी आपल्या बागांकरिता पुरेसे पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करणारे संजय खोत आता स्थिर आणि विश्‍वासार्ह पाणीपुरवठ्यामुळे लक्षणीय सुधारणा पाहत आहेत. ''माझी विहीर पूर्णपणे कोरडी पडली नाही आणि आमची चिकूची झाडे वर्षात दुसऱ्यांदा बहरली. मी आणखी एका पीक चक्रामधून फळे पिकवली. संवर्धन करण्‍यात आलेल्‍या तलावामुळे गावाकरिता पाणी मिळवण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा कमी झाला आहे. मोठ्या तलावात पर्यटन स्थळ बनण्याची क्षमता आहे, ज्यामुळे गावकऱ्यांना उपजीविकेच्या अतिरिक्‍त संधी उपलब्ध होतील,'' असे ते म्हणाले. गोड्या पाण्याच्या नियमित उपलब्धतेमुळे, त्यांच्या चिकूच्या बागा पुन्हा एकदा भरभराटीला येत आहेत, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबासाठी स्थिर उत्पन्‍न सुनिश्चित होत आहे.
समुदाय-संचालित सोल्‍यूशन्‍सचे महत्त्व सांगताना टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी म्हणाले, ''ग्रामीण समृद्धीसाठी पाणी सुरक्षा मुलभूत गरज आहे. सरकार आणि नाम फाउंडेशन सारख्या स्वयंसेवी संस्थांसोबत एकत्र काम करत आम्ही जलसाठ्यांचे संवर्धन करण्‍यासोबत संपूर्ण समुदायांचे जीवन देखील सुधारत आहोत, ज्यामुळे संजय खोत सारख्या शेतकऱ्यांना शाश्‍वत फायदे मिळत आहेत.''


एकेकाळी कोरडे असलेले तलाव आता गोड्या पाण्यासह सुधारले आहेत, पाण्‍याची पातळी वाढली आहे आणि चिकूची झाडे बहरत आहेत.
नुकतेच, महाराष्‍ट्र सरकारने आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत घोलवड ग्रामपंचायतीला १० लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे. घोलवड शाश्‍वत जल संसाधनांसह भविष्याकडे वाटचाल करत असताना संजय यांच्‍या प्रवासामधून दिसून येते की, लक्ष्यित हस्‍तक्षेप समुदायांच्‍या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो. यामधून जबाबदार व प्रभावी सीएसआर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून समुदायांचे सक्षमीकरण करण्‍याप्रती टाटा मोटर्सची कटिबद्धता अधिक दृढ होते.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/