बटाटा - कांद्याची भाजी
साहित्य: 3 मध्यम आकाराचे बटाटे, 1 चिरलेला कांदा, 1 टीस्पून मोहरी, 4-5 कढीपत्ता, 1/4 टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, सजवण्यासाठी कोथिंबीर आणि किसलेले नारळ , 1 टीस्पून लिंबाचा रस, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : बटाटे उकडून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि कढीपत्ता घाला. नंतर त्यात कांदा घालून परता. आता त्यात बटाटा, हळद, मीठ, हिरवी मिरची घालून परतून घ्या आणि मंद आचेवर 2-3 मिनिटे शिजवा. लिंबाचा रस, कोथिंबीर आणि नारळ एकत्र करून भांडे गॅसवरुन उतरवा. तयार भाजी पुरी आणि दह्यासोबत सर्व्ह करा.
समोसा
साहित्य : भरण्यासाठी : 3 चमचे तेल, 1 चमचा आले-लसूण पेस्ट, 1 वाटी हिरवे वाटाणे, 2 मध्यम आकाराचे बटाटे, 1 टेबलस्पून धनेपूड, 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून हळद,
1 टीस्पून बडीशेप, चवीनुसार मीठ कव्हरसाठी: 2 वाट्या मैदा, अर्धा कप गरम तेल, अर्धा टीस्पून ओवा, कोमट पाणी, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती: समोशाच्या सारणासाठी: कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाका, मोहरी तडतडायला लागली की त्यात हिरवे वाटाणे घालून परतून घ्या, नंतर आले-लसूण पेस्ट, हळद घालून थोडा वेळ परतून घ्या. वरील सर्व पावडर मसाले आणि बटाटे घालून कोरडे होईपर्यंत परतून घ्या. शेवटी कोथिंबीर घाला. मीठ, ओवा आणि कोमट तेल घालून पीठ मळून घ्या. त्याचे गोळे बनवा. आता त्याला समोशाचा आकार द्या आणि त्यात सारण भरून बंद करा. मंद आचेवर समोसे तळून घ्या आणि हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.