Close

भारतातील ९४ टक्‍के बी२बी मार्केटर्सच्‍या मते, एआय उच्‍च आरओआयला गती देत आहे: लिंक्‍डइन (94% of B2B marketers in India say AI is driving higher ROI: LinkedIn)

• भारतातील जवळपास निम्‍मे बी२बी मार्केटर्स म्‍हणतात की, त्‍यांना दर महिन्‍याला सी-सूटसाठी विपणन खर्चाचे कारण सांगावे लागते
• बहुतांश बी२बी मार्केटर्स म्‍हणतात की, मूल्‍य घटक हे मोहिमेच्‍या यशाचे प्रबळ सूचक आहेत
• १० पैकी ९ बी२बी मार्केटर्स मान्‍य करतात की, त्‍यांना मोहिमा डिझाइन व कस्‍टमाइज करण्‍यासाठी एआयचा वापर करताना आरओआयमध्‍ये वाढ होताना दिसत आहे
• लिंक्‍डइनने बी२बी मार्केटर्सना अचूक मोहिम मापनाच्‍या माध्‍यमातून सर्वोत्तम आरओआयला गती देण्‍यास मदत करण्‍यासाठी कन्‍वर्जन्‍स एपीआय (सीएपीआय) मध्‍ये सुधारणांची घोषणा केली आहे.

भारत, फेब्रुवारी २०, २०२५: जगातील सर्वात मोठे प्रोफेशनल नेटवर्क आणि आघाडीचे बी२बी अॅडव्‍हर्टायझिंग प्‍लॅटफॉर्म लिंक्‍डइन (LinkedIn)ने केलेल्‍या नवीन संशोधनाच्‍या मते, बी२बी मार्केटर्ससाठी दबाव वाढत आहे, जेथे भारतातील जवळपास निम्म्या मार्केटर्सना दर महिन्‍याला सी-सूट कार्यकारींना विपणन खर्चाचे कारण सांगावे लागते. बी२बी खरेदी चक्रांचे प्रमाण वाढत असताना बहुतांश (८९ टक्‍के) बी२बी मार्केटर्स म्‍हणतात की कॅम्‍पेनच्‍या दीर्घकालीन प्रभावाचे मापन करणे अधिक आव्‍हानात्‍मक होत आहे.

लिंक्‍डइनच्‍या नवीन ‘बी२बी आरओआय इम्‍पॅक्‍ट' संशोधनामध्‍ये* यूएस, यूके, फ्रान्‍स आणि भारतातील १,००० हून अधिक बी२बी मार्केटर्सचे सर्वेक्षण करण्‍यात आले. या संशोधनामधून मार्केटर्सना कंपनी महसूलावरील त्‍यांच्‍या कामाचा प्रभाव दाखवण्‍यासाठी सामना करावा लागणारा दबाव दिसून येतो. देशातील ८४ टक्‍के बी२बी सीएमओ म्‍हणतात की गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये कॅम्‍पेन रिटर्न-ऑन-इन्‍व्‍हेस्‍टमेंट (आरओआय) सिद्ध करून दाखवणे अधिक महत्त्वाचे बनले आहे.

या संशोधनामधून निदर्शनास येते की, बी२बी मार्केटर्सना आरओआय दाखवताना तीन प्रमुख अडथळ्यांचा सामना करावा लागतो - विशेषत: बी२बी कॅम्‍पेन्‍ससाठी प्रमाणीकृत उद्योग मापदंड व मेट्रिक्‍सचा अभाव (४२ टक्‍के); विशिष्‍ट कॅम्‍पेन्‍सना रूपांतरणांचे अचूक श्रेय देण्‍यामध्‍ये अडथळा (३९ टक्‍के); विविध डेटा प्‍लॅटफॉर्म्‍सदरम्‍यान एकीकरणाच्‍या समस्‍या (३९ टक्‍के) आणि विक्री व विपणनादरम्‍यान मेट्रिक्‍ससंदर्भात संस्‍थात्‍मक एकीकरणाचा अभाव (३८ टक्‍के).

भारतातील लिंक्‍डइन मार्केटिंग सोल्‍यूशन्‍सचे संचालक सचिन शर्मा (Sachin Sharma, Director, LinkedIn Marketing Solutions, India) म्‍हणाले, “२०२५ मध्‍ये भारतातील बी२बी मार्केटर्ससाठी आरओआय सिद्ध करणे प्रमुख प्राधान्‍य असताना वरिष्‍ठ प्रमुखांसोबतचे त्‍यांच्‍या संबंधावर अधिक फोकस असेल. १० पैकी ९ मार्केटर्स कॅम्‍पेन परताव्‍यांमध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी आणि आरओआयचे उत्तमप्रकारे मापन करण्‍यासाठी एआय टूल्‍सचा वापर करत आहेत, ज्‍यामुळे बी२बी मार्केटर्सनी ‘आकारमान मेट्रिक्‍सपेक्षा मूल्‍य मेट्रिक्‍स'ला प्राधान्‍य देण्‍यासाठी प्रमुखांसोबत काम केले पाहिजे. हे ध्‍येय साध्‍य करण्‍यासाठी त्‍यांनी योग्‍य एआय टूल्‍सचा अवलंब केला पाहिजे, जे कॅम्‍पेनचा प्रभाव अधिक अचूकतेसह मापन करण्‍यास मदत करू शकतात, परिणामत: व्‍यवसायामध्‍ये सर्वोत्तम निष्‍पत्ती मिळतील.''

बहुतांश बी२बी मार्केटर्स म्‍हणतात की मूल्‍य मेट्रिक्‍स हे कॅम्‍पेनच्‍या यशाचे प्रबळ सूचक आहेत

संशोधनामधून निदर्शनास येते की, आकारमान मेट्रिक्‍स जसे कस्‍टमर अॅक्विझिशन कॉस्‍ट (सीएसी), कॉस्‍ट पर एंगेजमेंट (सीपीई) आणि रिटर्न ऑन अॅड स्‍पेण्‍ड (आरओएएस) हे वरिष्‍ठ प्रमुखांकडून काही सर्वात वारंवार विनंती करण्‍यात येणारे मेट्रिक्‍स असले तरी बी२बी मार्केटर्सना मानसिकतेमध्‍ये बदल करण्‍याची गरज असल्‍याचे माहित आहे. डेटामधून निदर्शनास येते की, भारतातील ४६ टक्‍के वरिष्‍ठ प्रमुख आरओएएसवर लक्ष केंद्रित करत असले तरी बी२बी मार्केटर्स मार्केटिंग क्‍वॉलिफाईड लीड्स (एमक्‍यूएल) आणि सेल्‍स क्‍वॉलिफाईड लीड्स (एसक्‍यूएल) अशा मूल्‍य मेट्रिक्‍सना कॅम्‍पेनच्‍या यशाचे प्रबळ सूचक मानतात.

आगामी वर्षाकडे वाटचाल करत बी२बी मार्केटर्स म्‍हणतात की, खरेदीदाराची खरेदी करण्‍याची शक्‍यता असे खरेदीदाराचे हेतू समजून घेणे कॅम्‍पेनची परिणामकारकता सिद्ध करण्‍यामधील मोठे आव्‍हान असेल, ज्‍यामधून पात्र लीड्सचे प्रभावीपणे मापन करण्‍यामधील महत्त्व दिसून येते. परिणामत: अर्ध्‍याहून अधिक (५३ टक्‍के) मार्केटर्स खरेदी निर्णयावर प्रभाव पाडण्‍यासाठी आणि रूपांतरणाला चालना देण्‍यासाठी ग्राहक समूह विपणन धोरणाला प्राधान्‍य देत आहेत, तसेच रिपोर्टिंगमध्‍ये कस्‍टमर लाइफटाइम व्‍हॅल्‍यू (सीएलव्‍ही)वर लक्ष केंद्रित करत आहेत.

९६ टक्‍के बी२बी मार्केटर्सचा विश्‍वास आहे की, एआयचा मापनावर सकारात्‍मक प्रभाव पडेल

ग्राहक समूह विकसित होण्‍यासोबत बी२बी मार्केटर्सना योग्‍य निर्णय घेणे आणि कॅम्‍पेनची परिणामकारकता सुधारण्‍यामध्‍ये आव्‍हानांचा सामना करावा लागत आहे. असे असताना भारतातील १० पैकी ९ बी२बी मार्केटर्सचा विश्‍वास आहे की, पुढील पाच वर्षांमध्‍ये एआयचा मापनावर सकारात्‍मक प्रभाव पडेल.

तसेच, ९४ टक्‍के बी२बी मार्केटर्स देखील मान्‍य करतात की त्‍यांना कॅम्‍पेन्‍स डिझाइन व ऑप्टिमाइज करण्‍यासाठी एआयचा वापर करताना आरओआयमध्‍ये सुधारणा होताना दिसत आहे. संशोधानामधून निदर्शनास येते की ते ग्राहक विभाग लक्ष्‍य वाढवण्‍यासाठी (६५ टक्‍के), सर्वोत्तम लीड स्‍कोअरिंगसाठी अंदाजात्‍मक विश्‍लेषणाला चालना देण्‍यासाठी (५७ टक्‍के) आणि रिअल-टाइममध्‍ये जाहिरात खर्च व क्रिएटिव्‍ह कन्‍टेन्‍ट ऑप्टिमाइज करण्‍यासाठी (५५ टक्‍के) एआयचा वापर करत आहेत.

भविष्‍याकडे वाटचाल करत बी२बी मार्केटर्सचा विश्‍वास आहे की पुढील पाच वर्षांमध्‍ये एआय जाहिरातीच्‍या परिणामकारकतेचे मापन करणे (६२ टक्‍के), कन्‍टेन्‍ट निर्मिती व वैयक्तिकरण (६० टक्‍के) आणि अंदाजात्‍मक विश्‍लेषण (५३ टक्‍के) यामध्‍ये सर्वात बहुमूल्‍य ठरेल.

लॉरियल इंडियाच्‍या चीफ डिजिटल अँड मार्केटिंग ऑफिसर सलोनी जवेरी (Saloni Javeri, Chief Digital & Marketing Officer at L’Oréal India ) म्‍हणाल्‍या, “लिंक्‍डइनचे प्रोफेशनल नेटवर्किंग आणि कन्‍टेन्‍ट मार्केटिंगचे अद्वितीय एकत्रिकरण लॉरियलला उद्योग व्‍यावसायिक, संभाव्‍य कर्मचारी, गुंतवणूकदार आणि ग्राहक अशा प्रमुख भागधारकांसोबत कनेक्‍ट होण्‍यास सक्षम करते. लॉरियल सेन्‍स ऑफ परपोज अशा लक्ष्यित कॅम्‍पेन्‍सच्‍या माध्‍यमातून आम्‍ही ब्रँड जागरूकता, कॉर्पोरेट प्रतिष्‍ठा आणि उच्‍च संबंधित व प्रभावी ग्राहकांसोबतचा सहभाग प्रबळ केले आहे. लिंक्‍डइनचे अत्‍याधुनिक लक्ष्‍य व विश्‍लेषण आम्‍हाला प्रभावाचे मापन करण्‍यास, कॅम्‍पेन्‍स ऑप्टिमाइज करण्‍यास आणि आरओआय वाढवण्‍यास मदत करतात.''

लिंक्‍डइन बी२बी मार्केटर्सना कॅम्‍पेनची कामगिरी आणि व्‍यवसायाच्‍या प्रभावाचे मापन करण्‍यास मदत करण्‍यासाठी सोल्‍यूशन्‍समध्‍ये गुंतवणूक करत आहे

लिंक्‍डइन बी२बी मार्केटर्सना कॅम्‍पेनची कामगिरी आणि व्‍यवसायाच्‍या प्रभावावर अधिक स्‍मार्टपणे देखरेख ठेवण्‍यास मदत करण्‍यासाठी आपल्‍या मापन सोल्‍यूशन्‍सला प्रबळ करत आहे. कन्‍वर्जन्‍स एपीआय (सीएपीआय) आणि रेव्‍हेन्‍यू अॅट्रिब्‍युशन रिपोर्ट (आरएआर) मधील नवीन गुंतवणूका पुढीलप्रमाणे आहेत:

• कन्‍वर्जन्‍स एपीआय: कन्‍वर्जन्‍स एपीआय (Conversions API)सह बी२बी मार्केटर्स कारवाई करण्‍याची शक्‍यता असलेल्‍या ग्राहकांना लक्ष्‍य करण्‍यासाठी त्‍यांचे फर्स्‍ट-पार्टी डेटा - ऑनलाइन व ऑफलाइन ग्राहक इंटरअॅक्‍शन्‍स लिंक्‍डइनशी कनेक्‍ट करू शकतात. कॅम्‍पेन ध्‍येयांशी संलग्‍न केल्‍यास हे आरओआयला गती देण्‍यासाठी प्रभावी टूल ठरू शकते. प्रभाव, क्लिक्‍स आणि सामान्‍य लीड्ससाठी लीड जनरेशन कॅम्‍पेन्‍सना ऑप्टिमाइज करण्‍याव्‍यतिरिक्‍त मार्केटर्स आता पात्र लीड्ससाठी ऑप्टिमाइज करू शकतात, जे त्‍यांच्‍या मार्केटिंग किंवा सेल्‍स-क्‍वॉलिफाईड निकषांची (एमक्‍यूएल किंवा एसक्‍यूएल) पूर्तता करतात.

परिणामत: कन्‍वर्जन्‍स एपीआयसह मार्केटर्स जबाबदार रूपांतरणामध्‍ये सरासरी ३१ टक्‍के वाढ प्राप्‍त करत आहेत, प्रतिकारवाई खर्चामध्‍ये २० टक्‍के घट करत आहेत, तसेच लवकर निकालांमधून प्रति पात्र लीड्स खर्चामध्‍ये ३९ टक्‍के घट दिसून येते.

कॅशफ्री पेमेंट्स येथील मार्केटिंगच्‍या प्रमुख अदिती ओलेमन (Aditi Oleman, Head of Marketing at Cashfree Payments) लिंक्‍डइन व्‍यवसायाच्‍या प्रभावाला चालना देण्‍यामध्‍ये कशाप्रकारे मदत करते याबाबत मत व्‍यक्‍त करत म्‍हणाल्‍या, “लिंक्‍डइनमध्‍ये आम्‍ही आमचा ब्रँड विकसित करतो आणि योग्‍य ग्राहकांसह वास्‍तविक रूपांतरणाला चालना देतो. नवीन उत्‍पादने लाँच करायची असोत, एसएमबींना सामील करायचे असो किंवा उद्योग माहिती शेअर करायची असो लिंक्‍डइन खात्री घेते की आम्‍ही महत्त्वपूर्ण असलेल्‍या धोरणकर्त्‍यांपर्यंत पोहोचत आहोत. व्‍यावसायिक वातावरण, अचूक लक्ष्‍य आणि विश्‍लेषण दृश्‍यमानतेला चालना देण्‍यासोबत कारवाईला देखील गती देतात. आमच्‍यासाठी हे फक्‍त चॅनेल नसून महत्त्वपूर्ण टूल आहे, जेथे विचारशील नेतृत्‍वाचा व्‍यवसायाच्‍या वास्‍तविक प्रभावावर अनुकूल परिणाम होतो.''

• रेव्‍हेन्‍यू अॅट्रिब्‍युशन रिपोर्ट: बी२बी मार्केटर्स त्‍यांची संधी व पाइपलाइन डेटा प्रत्‍यक्ष किंवा मार्केटिंग पार्टनर्स (Marketing Partners)च्‍या माध्‍यमातून लिंक्‍डइनशी कनेक्‍ट करतात तेव्‍हा ते रेव्‍हेन्‍यू अॅट्रिब्‍युशन रिपोर्ट (Revenue Attribution Report) (आरएआर)सह सेल्‍स मेट्रिक्‍सवरील त्‍यांच्‍या कॅम्‍पेन्‍सच्‍या अकाऊंट-स्‍तरीय प्रभावाला सिद्ध करू शकतात. आरएआर जाहिरातदारांना महसूल प्रभाव, जाहिरात खर्चावरील परतावा व पाइपलाइन अशा मेट्रिेक्‍सच्‍या माध्‍यमातून विपणन प्रयत्‍न करत व्‍यवसायामध्‍ये सकारात्‍मक प्रभाव निर्माण करण्‍यास सक्षम करते.

**कन्‍वर्जन्‍स एपीआय आणि आरएआर जागतिक स्‍तरावर सहयोगी एकीकरण व एपीआयद्वारे उपलब्‍ध आहेत. येत्‍या काही महिन्‍यांमध्‍ये आम्‍ही चाचणी करत असलेल्‍या नवीन आरएआर कार्यक्षमता जगभरातील ग्राहकांना उपलब्‍ध करून देण्‍याची अपेक्षा करतो.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/