बेबी पोटॅटो आणि शेपूचे सॅलड साहित्य : 10-12 लहान उकडून सोललेले बटाटे,1 वाटी घट्ट दही, 1/4 वाटी शेपूची पाने, अर्धा टीस्पून हिरवी मिरची, अर्धा टीस्पून साखर आणि चवीनुसार मीठ. कृती : सर्व साहित्य एकत्र करून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. सॅलड किंवा स्टार्टर म्हणून सर्व्ह करा. आलू पीनट रोल साहित्य : 1 कप शेंगदाण्याचे कूट, 1 कप उकडून मॅश केलेले बटाटे, अर्धा कप उकडलेले सुरण,अर्धा कप आरारूट पावडर, 1/4 कप बारीक चिरलेला पुदिना, 2 चमचे आले-हिरवी मिरची पेस्ट, 1 टीस्पून साखर, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल. कृती : उकडलेले बटाटे, सुरण, आले-हिरवी मिरची पेस्ट, पुदिना, मीठ, साखर, 1/4 कप अरारूट, 1 टीस्पून शेंगदाण्याचे कूट एकत्र करून गोल आकाराचे रोल तयार करा. आता उरलेल्या आरारुटमध्ये 2 चमचे पाणी घाला आणि पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये रोल घोळवा, नंतर शेंगदाणा पावडरमध्ये बुडवा आणि गरम तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा.
Link Copied