Close

अर्जून कपूरने मलायका अरोराचा डान्स पाहून केले कौतुक (Arjun Praises His Ex Girlfriend Malaika)

अर्जुन कपूरने नुकतीच मलायका परीक्षक असलेल्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर’ या रिॲलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. अर्जुन कपूर त्याच्या आगामी चित्रपट 'मेरे हसबंड की बीवी'च्या प्रमोशनसाठी या रिअॅलिटी शोमध्ये पोहोचला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून अर्जुन कपूर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर भूमी पेडणेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने कलाकारांनी या रिॲलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. आता या शोमध्ये अर्जुन कपूरने केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर’मध्ये मलायकाबरोबर रेमो डिसूझा व गीता कपूर यांनी स्पर्धकांबरोबर मलायकाच्या गाजलेल्या गाण्यांवर डान्स केला. अर्जुन व भूमी यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या डान्सनंतर या शोचे सूत्रसंचालन करणाऱ्या हर्ष लिंबाचियाने अर्जुन कपूरला त्याला डान्स कसा वाटला, यावर त्याची प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना अर्जुन कपूरने म्हटले, “बऱ्याच वर्षांपासून मी अवाक आहे. मला आताही शांतच राहायला आवडेल, पण मला हे सांगायचे आहे की मला माझी आवडती गाणी ऐकण्याची संधी मिळाली. या गाण्यांमधून तिच्या करिअर व आयुष्याविषयी जाणून घेता येते. अशा प्रकारची गाणी, परफॉर्मन्स आणि आताही ती व्यक्ती ज्या पद्धतीने तिचे काम करीत आहे, त्यासाठी तिचे आपण कौतुक करू शकतो, त्यासाठी मलायका तुझे अभिनंदन. तुला माहीतच आहे की मला ही गाणी किती आवडतात. अशा पद्धतीने तू हे सर्व साजरे करत आहेस, हे पाहून आनंद झाला”, अर्जुनच्या या प्रतिक्रियेनंतर मलायकाने त्याला “धन्यवाद” म्हणत प्रतिसाद दिला.

दरम्यान, मलायका व अर्जुन कपूर यांनी २०१८ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. मात्र, गेल्या वर्षी हे जोडपे वेगळे झाले. अर्जुन कपूरने एका कार्यक्रमात याबद्दल वक्तव्य केले होते. तो सिंगल असल्याचे त्याने म्हटले होते. त्यानंतर चर्चांना उधाण आले होते. आता अभिनेता अर्जुन कूपर लवकरच ‘मेरी हजबंड की बीवी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंग देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/