‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच वालावलकरांच्या घरी अंकिता व कुणाल यांचा मेहंदी सोहळा पार पडला.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/mendi-800x451.jpg)
मेहंदी सोहळ्यासाठी अंकिताने इंडो-वेस्टर्न लूक केल्याचं पाहायला मिळत आहे. नारिंगी रंगाच्या ड्रेसमध्ये अंकिता फारच सुंदर दिसत होती. तर, कुणालने यावेळी व्हाइट रंगाची डिझायनर शेरवानी घालून त्यावर अंकिताच्या ड्रेसला मॅच होईल अशी नारिंगी रंगाची ओढणी घेतली होती.
अंकिता व कुणाल या दोघांच्या मेहंदी सोहळ्याचे बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंना ‘कोकण हार्टेड गर्ल’ने खास कॅप्शन दिलं आहे. सुरुवातीला लाडक्या नवऱ्याचं कौतुक करत शेवटी अंकिताने कॅप्शनमध्ये “आयुष्याची पहिली पायरी सोबत चढतोय. आशीर्वाद असू द्या” असं आपल्या चाहत्यांना म्हटलं आहे.
अंकिता वालावलकर व कुणाल यांचा विवाहसोहळा कोकणातील देवबाग येथे पार पडणार आहे. अंकिताने आधीच कोकणात लग्न करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. यानुसार आता तिच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे घराघरांत अंकिताला एक वेगळी ओळख मिळाली. गेल्या कित्येक दिवसांपासून अंकिताचे चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात होते.