प्रेम, मैत्री, माणुसकी यावर भाष्य करणार साईरत्न एंटरटेन्मेंटचं प्रेमकवी अपूर्व राजपूत यांनी लिहीलेल्या कवितेतून साकारलेलं "एक चांदण्याची रात" हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात शहरी आणि ग्रामीण भागातून असणाऱ्या अनोळखी माणसांसोबत घालवलेल्या निःशब्द प्रेमाची जाणीव करून देणार आणि हृदयस्पर्शी संगीत अनुभव देणार आहे. या गाण्यात विशाल राऊत, विपुल धवन, दिपिका, वैष्णवी सांगळे, गायत्री नेरपगारे, शिवा मिरजकर, संकेत पगारे, विनायक पाटील, सौरभ अहिर, अंजली सिंग हे प्रमुख कलाकार आहेत. या गाण्याचे निर्माते सुरेश गाडेकर आणि संदेश गाडेकर हे आहेत. तर या गाण्याचे बोल प्रेमकवी अपूर्व राजपूत यांनी लिहिले आहेत. मनीष महाजन याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रज्वल यादव याने संगीत दिलं आहे. तर गायक जयदीप वैद्य आणि गायिका शीतल गद्रे यांनी हे गाणं गायल आहे.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/image-38-800x800.png)
कवी आणि गीतकार अपूर्व राजपूत 'एक चांदण्याची रात' या गाण्याच्या प्रोसेस विषयी सांगतो, "प्रेमकवी असल्यामुळे प्रेमातल्या विविध भावना वेगळ्या शब्दात मांडायला मला आवडतात. मी ग्रामीण भागातला आहे त्यामुळे या गाण्याचा बाज थोडा तसाच ठेवला आहे. चंद्र पांढरा पांढरा त्याला नाही तुझी सर, तुझा चेहरा सावळा त्यात तिळाची गं भर अशा अनुषंगाने काही प्रतिकं मला यात वापरता आली. आम्ही मित्र मिळून अक्षर तुझे आहे नावाचा कवितांचा कार्यक्रम करतो. त्यात स्वताच्या कविता कंपोज करून सादर करत असतो. माझा मित्र सारंग पंपटवार याने या कवितेला चाल दिली आहे. आम्ही कार्यक्रमाचा शेवट या गाण्याने करायचो. लोकांना या कवितेचं सादरीकरण फार आवडायचं. साईरत्न एंटरटेन्मेंटचे निर्माते सुरेश गाडेकर यांना ही चाल लावलेली कविता आवडली. आणि त्यांनी मला सांगितलं आपण या कवितेचं रूपांतर गाण्यात करूया. माझ्या कवितेचं गाणं झालं याचा मला फार आनंद झाला आहे. सध्या या गाण्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद देखिल मिळत आहे."
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/image-39-800x600.png)
या गाण्याचे निर्माते सुरेश गाडेकर गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतात, "एक चांदण्याची रात ही कविता ऐकताच क्षणी माझ्या मनाला भावली आणि म्हणून मी अपूर्व राजपूत यांना याच सुंदर गाणं करूया अस सांगितल. या गाण्याच चित्रीकरण आम्ही नाशिकच्या जंगलात रात्रीच्या वेळेस केल आहे. या गाण्याच चित्रीकरण एकाच रात्री करण्यात आल. पण संपूर्ण टीमने हे गाण सुंदररित्या शूट केलं. आणि सोशल मीडियावर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की साईरत्न एंटरटेन्मेंटच्या सर्वच गाण्यांवर तुमच प्रेम असंच असू द्या.”
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/image-40-800x600.png)
मधुर संगीत, सुंदर कथा आणि लाजवाब लोकेशन्सच्या माध्यमातून एक चांदण्यांची रात हे गाणं फुलल आहे. प्रेमाच्या दुनियेत हरवण्यासाठी हे गाण नक्की बघा !