रोमँटिक गाणं रांझा तेरा हीरिये अनिल मदनसुरी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेलं आता नुकतच प्रदर्शित झाल आहे. हे गाण आपल्या भावनिक कथानक आणि हृदयस्पर्शी सुरावटींमुळे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यास सज्ज आहे. या गाण्यात प्रणाली घोगरे आणि गौरव देशमुख यांची नवीन आणि आकर्षक जोडी पाहायला मिळेल. गाण्याचे बोल आणि संगीत अभिमन्यु कार्लेकर यांनी दिले असून, हे व्हॅलेंटाईन्स सीझनसाठी एक परिपूर्ण रोमँटिक ट्रीट ठरणार आहे.
हे गाणं पी बी ए फिल्म सिटी, पुणे आणि अलिबागच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर चित्रीत करण्यात आले आहे, जे एक भव्य दृश्य अनुभव प्रदान करते. रांझा तेरा हीरिये हे एस के प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार झाले असून, निर्माते श्रीनिवास कुलकर्णी आणि मधुसूदन कुलकर्णी आहेत, तर अमोल घोडके यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/image-36-450x800.png)
गाण्याची कथा रवि नावाच्या तरुणाच्या प्रेमावर आधारित आहे, जो वैदेही वर मनापासून प्रेम करतो. दररोज ती आपल्या गावाबाहेरच्या गॅरेजजवळून शहराकडे जाते, आणि रवि नेहमी दुपारी बारा वाजता तिला पाहण्यासाठी वाट बघत असतो. मात्र, त्याला आपले प्रेम व्यक्त करण्याची हिंमत होत नाही. छोटू, जो त्या गॅरेजचा मालक आहे, रविला आपली भावना सांगण्यासाठी प्रोत्साहित करत राहतो. अखेर, छोटू एक युक्ती लढवतो—तो रस्त्यावर खिळे टाकतो, ज्यामुळे वैदेहीच्या बाईकचे टायर पंक्चर होते आणि तिला गॅरेजवर थांबावे लागते. रवि तिच्या जवळ जातो आणि अचानक स्वप्नांच्या दुनियेत हरवतो—जिथे ते दोघे लग्न करून आनंदी संसार करत असतात. पण काही क्षणांतच त्याला वास्तवतेची जाणीव होते. वैदेही तिची बाईक दुरुस्त करून निघून जाते आणि रवि पुन्हा एकदा आपले प्रेम व्यक्त करण्यास अपयशी ठरतो. छोटू समजतो की रवि फक्त स्वप्न पाहत राहील, पण प्रत्यक्षात काहीच करणार नाही.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/image-37-800x533.png)
या गाण्याची मनाला भिडणारी कथा, भव्य लोकेशन्स आणि मधुर संगीत यामुळे ते प्रत्येकासाठी खास ठरणार आहे, ज्यांनी कधी तरी कोणावर तरी प्रेम केले, पण आपले प्रेम व्यक्त करण्याची हिम्मत करू शकले नाहीत. या गाण्याच्या चमूतील प्रमुख तंत्रज्ञांमध्ये डीओपी राहुल झेंडे आणि रोहित जेनकेवाड, संपादक अनिल मदनसुरी, कार्यकारी निर्माता संतोष खरात, डीआय कलरिस्ट देवा आव्हाड, आर्ट डायरेक्टर दिलीप कंढारे, मेकअप आर्टिस्ट हर्षद खुळे, हेअर स्टायलिस्ट सोनालिओझा, आणि कॉस्ट्यूम डिझायनर रश्मी मोखळकर यांचा समावेश आहे. लाइन प्रोड्यूसर राम शिंदे आणि प्रोडक्शन मॅनेजर नायुम आर. पठाण यांनी या प्रोजेक्टला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेष आभार किशोर नखाते, वैभव लातुरे, आणि गणेश म्हास्के यांचे आहेत. गाण्याच्या प्रसिद्धीची जबाबदारी सुमित जिंदाल आणि विनया प्रदिप सावंत यांनी सांभाळली आहे.
रांझा तेरा हीरिये या गाण्याचा ऑडिओ सर्व प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर ऐकता येईल. प्रेम आणि हृदयस्पर्शी संगीताचा हा सुंदर प्रवास चुकवू नका!