स्टार प्रवाहच्या ठरलं तर मग मालिकेत सुरु आहे लगीनघाई. पुर्णा आजीच्या इच्छेखातर अर्जुन आणि तन्वीच्या विवाहाचा घाट घालण्यात आलाय खरा मात्र हे लग्न पार पडणार का यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. कारण सायलीने अर्जुन आणि तन्वीचं लग्न होऊ द्यायचं नाही हे मनाशी पक्क ठरवलं आहे.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/image-32-800x533.png)
अगदी मेहंदी पासून ते हळदी पर्यंत सगळं काही सायलीच्या मनासारखं घडत आहे. या सगळ्या गोष्टी घडवून आणण्यासाठी सायलीने वेगवेगळी वेषही धारण केले आहेत. ऐन लग्नातही ती बॅंडवाल्याच्या रुपात लग्नमंडपात पोहोचणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेण्टाईन्स डेच्या दिवशीच अर्जुन सायली आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन देणार आहेत. त्यामुळे यंदाचा व्हॅलेण्टाईन्स डे आणि ठरलं तर मगचा विवाहसोहळा खऱ्या अर्थाने स्पेशल ठरणार आहे.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/image-33-800x533.png)
अर्जुन-सायलीने पुन्हा एकत्र यावं ही अवघ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. प्रेक्षक या दिवसाची गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. ठरलं तर मग मध्ये अखेर तो क्षण जवळ आलाय. अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यातील या अत्यंत महत्त्वाच्या दिवसाचा साक्षीदार होण्यासाठी ठरलं तर मगचे एपिसोड्स पाहायला विसरु नका आता नव्या वेळेत म्हणजे सव्वा आठ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.