Close

महेश मांजरेकर, रेणूका शहाणे, सुबोध भावे अशी मोठी स्टारकास्ट असेलला “देवमाणूस” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, या दिवशी सिनेमा होणार रिलीज ( Mahesh Manjrekar, Renuka Shahane, Subodh Bhave And Siddharth Bodke Starar Devmanus Film Release On 25 April)

तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित मल्टीस्टारर मराठी चित्रपट "देवमाणूस" ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि नुकतेच या चित्रपटात असलेल्या कलाकारांचे पोस्टर्स लाँच करण्यात आलेत. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके अशा ह्या दिग्गज आणि पॉवरहाऊस कलाकारांचे वैशिष्ट्य असलेले पोस्टर्स चाहत्यांना सिनेमात असलेल्या त्यांच्या प्रभावशाली स्वरूपाची एक झलक देतात जे नक्कीच उद्या रिलीज होणाऱ्या बहुप्रतिक्षित "देवमाणूस" टीझरच्या अपेक्षा वाढवतात.

रिलीझ झालेल्या ह्या पोस्टर्स मध्ये आपण चित्रपटाच्या मुख्य पात्रांचे अतिशय मोहक फर्स्ट लुक पाहू शकतो. अभिनेते महेश मांजरेकर ह्यांचा खूपच साधा पण इंटेन्स लुक आपल्याला दिसून येतो, त्यांची भेदक नजर त्यांच्या या भूमिकेची गंभीरता सांगते.

अभिनेत्री रेणुका शहाणे ह्यांचा मायाळू, सरळ देखावा आणि मनमोहक लुक लक्ष वेधून घेणारा आहे तर सुबोध भावे ह्यांना पोलिसांच्या हटके भूमिकेत पाहू शकतो तसेच अभिनेता सिद्धार्थ बोडके त्याच्या हसण्याने सिनेमाचं आणि त्याच्या भूमिकेचं रहस्य वाढवतो. अशा या अनोख्या पोस्टर्समुळे उद्या टीझरमध्ये नक्की काय असणार आहे याची उत्सुकता सर्वांना आहे.

लव फिल्म्स प्रस्तुत, "देवमाणूस" या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर ह्यांनी केले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/