क्रिस्पी गार्लिक पोटॅटो
साहित्य: 2 मोठे बटाटे, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, चिमूटभर अजिनोमोटो, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर, तळण्यासाठी तेल, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, 1 चमचा बारीक चिरलेले आले,अर्धा कप टोमॅटो सॉस, थोडासा हिरवा पातीचा कांदा
कृती : बटाटे सोलून त्यांचे काप करा. कांद्याच्या पात मोठ्या तुकड्यात कापून घ्या. बटाटे मिठाच्या पाण्यात 5-7 मिनिटे उकळवा. त्यानंतर बटाटे पाण्यातून गाळून बाजूला ठेवा. कॉर्नफ्लोअर, मीठ, काळी मिरी आणि अजिनोमोटो एकजीव करुन घ्या. बटाट्याचे चिप्स त्या मिश्रणात घोळवून तळून घ्या. आता एक टेबलस्पून तेल घालून त्यात कांदा, लसूण, आले आणि मीठ घालून एक मिनिट मंद आचेवर परतून घ्या. टोमॅटो सॉस घाला. बटाट्याच्या चिप्स घाला, क्रिस्पी गार्लिक पोटॅटो तयार आहे.
गोमंतक आलू पराठा
साहित्य : 3 उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे, 1 किसलेला कांदा, 2 टीस्पून आले-लसूण पेस्ट, 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, कढीपत्ता ,1 /4 टीस्पून हिंग, 1 टीस्पून उडीद डाळ, 2-3 कप गव्हाचे पीठ, चवीनुसार 1 मीठ आणि आवश्यकतेनुसार तेल.
कृती : 1 टीस्पून तेल आणि थोडे मीठ घालून पीठ मळून घ्या, कढईत एक चमचा तेल घाला, त्यात कढीपत्ता, हिंग, उडीद डाळ घालून फोडणी तयार करा. त्यात लाल तिखट, गरम मसाला पावडर, कांदा, लसूण आले पेस्ट घालून
2 मिनिटे परतून घ्या. त्यात बटाटे, हळद, मीठ घालून मिक्स करा. भांडे आचेवरुन उतरवा आणि थंड होऊ द्या, पिठाचे 6 गोळे करा, त्यात बटाट्याचे मिश्रण भरा आणि पराठे लाटून घ्या. लसूण चटणीबरोबर सर्व्ह करा.