साहित्य: 250 ग्रॅम भेंडी, 1 बटाटा, 1 उभा व पातळ चिरलेला कांदा, 1 उभा व पातळ चिरलेला टोमॅटो, मीठ चवीनुसार,
अर्धा टीस्पून हळद, 2 टेबलस्पून तेल.
मसाल्यासाठी: 50 ग्रॅम लसूण, 50 ग्रॅम कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार, 1 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून भाजलेले बेसन, 2 टीस्पून धणे, 1 टीस्पून जिरे.
कृती: सगळे मसाले भाजून वाटून घ्या. भेंडी धुवून पुसून मधे चिरून घ्या. त्यात मसाला भरा. उरलेल्या मसाल्यात बटाटा घोळवून घ्या. कढईत तेल गरम करून कांदा परता. टोमॅटो, मीठ, टोमॅटो, हळद व काश्मिरी लाल मिरची पूड टाका. भेंडी व बटाटा टाकून मंद आचेवर शिजवा.
मसालेदार भेंडी (Masaledar Bhendi)
Link Copied