सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. नुकतेच त्याच्या पहिल्या 'नादानियां' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. या चित्रपटात तो खुशी कपूरसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचा निर्माता करण जोहर आहे.
हा चित्रपट थिएटरमध्ये नाही तर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाईल. मात्र निर्मात्यांनी अद्याप रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही.
शौना गौतमही नादानियांमधून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात शौना करण जोहरची सहाय्यक दिग्दर्शक होती.
इब्राहिम आणि खुशी व्यतिरिक्त महिमा चौधरी, सुनील शेट्टी, दिया मिर्झा आणि जुगल हंसराज हे कलाकारही नादानियां चित्रपटात दिसणार आहेत. धर्मा प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी केली आहे.
इब्राहिम हा सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांचा मुलगा आहे. त्याची मोठी बहीण सारा अली खान देखील चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.
अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी इब्राहिमने २०२३ मध्ये धर्मा प्रोडक्शनच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. नादानियांनंतर इब्राहिमचा दुसरा चित्रपट सरजमीन असेल. या चित्रपटात तो काजोलसोबत दिसणार आहे.