थंडीच्या दिवसांत कोबी आणि कांदा यांच्या वेगवेगळ्या पाककृती बनवून खाण्यात काही वेगळीच मजा असते. आज आपण या दोघांचं कॉम्बिनेशन करून कोबी आणि कांद्याची मस्त लज्जतदार भजी बनवूया.
साहित्य :
१ कप कोबी (किसून घेतलेला)
२ कांदे (पातळ आणि लांब भजीसाठी कापतो तसे कापून घ्या)
२-२ टेबलस्पून बेसन, तांदळाचं पीठ आणि चिरलेली कोथिंबीर
३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१-१ टीस्पून धणे आणि ओवा (भरड करून घ्या)
अर्धा - अर्धा टीस्पून हळद आणि लाल तिखट
१ लिंबाचा रस
मीठ चवीनुसार
तळण्यासाठी तेल
कृती :
प्रथम कोबी आणि कांदा एकत्र करून त्यात मीठ घालून १० मिनिटे बाजूला ठेवा.
नंतर कोबी आणि कांद्याला सुटलेलं पाणी दाबून काढून टाका.
आता तेल वगळता बाकी सर्व साहित्य त्यात मिक्स करा.
कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आकाराच्या भज्या त्यात सोडा.
मंद आचेवर सोनेरी रंगावर भज्या तळून घ्या.
हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.